Military Entrance Exam, Rashtriya Indian Military College (R.I.M.C.) DEHRADUN, सैन्य महाविद्यालय प्रवेशपात्रता परीक्षा, राष्ट्रीय इंडियन मिलिटरी
Military College Entrance Exam Dec.2021
सैन्य महाविद्यालय प्रवेशपात्रता परीक्षा
डिसेंबर २०२१
राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड प्रवेशपात्रता परीक्षा डिसेंबर २०२१महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी "राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून (उत्तराखंड) येथे फक्त इयत्ता ८ वी साठीची प्रवेशपात्रता परीक्षा आहे" ही परीक्षा दिनांक १८ डिसेंबर २०२१ रोजी पुणे येथे घेण्यात येणार आहे. ही परीक्षा फक्त मुलांसाठीच आहे याची नोंद घ्यावी.
• प्रवेश वयाची अट:
१) या परीक्षेसाठी उमेदवाराचे विद्यार्थ्याचे) वयोमर्यादा (वय) दिनांक ०१ जुलै २०२२ रोजी ११.५(अकरा वर्ष सहा महिने) पेक्षा कमी आणि १३ (तेरा) वर्षापेक्षा अधिक नसावे. म्हणजेच विद्यार्थ्याचा उमेदवाराचा) जन्म दिनांक ०२ जुलै २००९ च्या आधि व दिनांक आणि ०१ जानेवारी २०११ च्या नंतरचा नसावा,
• शैक्षणिक पात्रता :
विद्यार्थी (उमेदवार दिनांक ०१ जुलै २०२२ रोजी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमध्ये इयत्ता ७ वी वर्गात शिकत असावा किंवा ७ वी उत्तीर्ण झालेला असावा.
• परीक्षा शुल्क :
आवेदनपत्र (फॉर्म) ऑफलाईन किंवा ऑनलाईन पध्दतीने पैसे भरून आपण मागवू शकता:
१) परीक्षेसाठी मा. कमांडंट "राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड, यांचेकडून विहित नमुन्यातीलच आवेदनपत्र (फॉर्म) घ्यावयाचा आहे. जनरल सर्वगातील विद्यार्थी उमेदवारा) करीता रु. ६००/- चा डी.डी. व अनुसूचित जाती/जमाती करीता रु. ५५५/- चा डी.डी. कमांडंट "राष्ट्रीय भारतीय सैन्य कॉलेज, डेहराडून, स्टेट बैंक ऑफ इंडिया, तेल भवन, देहराडून, बँक कोड नं. (०१५७६) च्या नावाने काढावा. सदर डी. डी. मा. कमांडंट "राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड, २४८००३ या पत्त्यावरती पाठविणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती/जमाती करीता डी. डी. सोबत जातीच्या दाखल्याची सत्यप्रत/छायांकितप्रत पाठविणे बंधनकारक आहे. डी.डी. पाठवितांना आपल्याला ज्या पत्त्यावर आवेदनपत्र (फॉर्म) मागवायचा आहे तो पत्ता पिन कोड सह अचूक नमूद करावा. त्यानंतर आपणास आवेदनपत्र (फॉर्म) व मागील १० वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा संच व माहिती पुस्तीक स्पीड पोस्टाव्दारे आपण दिलेल्या पत्त्यावर प्राप्त होईल.
२) ऑनलाईन पध्दतीने पैसे भरून परीक्षेसाठी आवेदनपत्र (फॉर्म) मा. कमांडंट राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्याकडून मागविण्याकरीता आपण राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्या www.rimc.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने पैसे भरून आवेदनपत्राची (फॉर्म) ची मागणी आपण करू शकता.
- आवेदनपत्र परीपूर्ण पणे भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून मा. आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, १७ डॉ. आंबेडकर मार्ग, लाल देऊळाजवळ, पुणे ४११००१ या पत्त्यावरती दिनांक ३० ऑक्टोबर २०२१ पर्यंत पोहचतील अशा पध्दतीने स्पीड पोस्टाने पाठवावीत किंवा समक्ष जावून जमा करावीत, अंतिम मुदतीनंतर उशीराने आलेले आवेदनपत्र (फॉर्म) कोणत्याही परिस्थिती मध्ये स्वीकारले जाणार नाहीत.
- भारत सरकार, संरक्षण मंत्रालय यांचे पत्र क्र. A/36105 / GS/MT-6/D (GS-II) दिनांक ०३ सप्टेंबर २०१४ नुसार केंद्र सरकारी नोकरीस असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मुले लेखी आणि मौखिक परीक्षा ज्या राज्यमध्ये संबधीत कर्मचाऱ्यांची पोस्टींग आहे त्या ठिकाणी देवू शकतात. त्या मुलांची निवड त्यांच्या मुळ अधिवास राज्यानुसार हाईल | आणि त्यांची उमेदवारी देखील त्यांच्या मूळ अधिवासाच्या स्थितीनुसार असेल. उमेदवार (विद्यार्थी) ज्या राज्यातून परीक्षा देऊ इच्छितो त्याच राज्यात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.
COMMENTS