डॉ. सी. व्ही. रमण बालवैज्ञानिक परीक्षा | Dr. C. V. Raman Balvaidnyanik Examination संशोधनात्मक वृत्ती वाढवणारा उपक्रम
डॉ. सी. व्ही. रमण बालवैज्ञानिक परीक्षा | Dr. C. V. Raman Balvaidnyanik Examination संशोधनात्मक वृत्ती वाढवणारा उपक्रम. स्वतः भोवती घडणाऱ्या अनेक घटना लहान मुले बारकाईने पाहत असतात व त्याचे त्यांना फार कुतूहल वाटत असते, हे कसे घडते ? याविषयी अनेक प्रश्न त्यांच्या मनात तयार होत असतात.आकाश निळेच का दिसते ?सुर्य उगवताना आणि मावळताना लाल का दिसतो ? पानांचा रंग हिरवाच का ?रिमोट द्वारे खेळणी कशा चालतात ?जिज्ञासा पोटी घडणाऱ्या घटनांच्या मागील कार्यकारण भाव समजावून घेण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो, परंतु या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांना सहजपणे उपलब्ध होतीलच असे नाही.
डॉ. सी. व्ही. रमण बालवैज्ञानिक परीक्षा | Dr. C. V. Raman Balvaidnyanik Examination
संशोधनात्मक वृत्ती वाढवणारा उपक्रम..
स्वतः भोवती घडणाऱ्या अनेक घटना लहान मुले बारकाईने पाहत असतात व त्याचे त्यांना फार कुतूहल वाटत असते, हे कसे घडते ? याविषयी अनेक प्रश्न त्यांच्या मनात तयार होत असतात.आकाश निळेच का दिसते ?
सुर्य उगवताना आणि मावळताना लाल का दिसतो ? पानांचा रंग हिरवाच का ?
रिमोट द्वारे खेळणी कशा चालतात ?
जिज्ञासा पोटी घडणाऱ्या घटनांच्या मागील कार्यकारण भाव समजावून घेण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो, परंतु या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांना सहजपणे उपलब्ध होतीलच असे नाही.
आज प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल, जिज्ञासा, संशोधक वृत्ती आणि काही तरी वेगळे करण्याची आवड निश्तितच आहे, परंतु हे सर्व गुण फुलवण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी आपणास आवश्यकता आहे प्रत्यक्षात प्रायो कौशल्य व संशोधनात्मक वृत्ती वाढवणाऱ्या उपक्रमामध्ये सहभागी होण्याची व ती संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा हा प्रयत्न..
विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी यंदा आम्ही नवीन उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्याला दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असे ऑनलाईन स्टडी मटेरियल अगदी नाममात्र शुल्क आकारून उपलब्ध करून दिले आहे. हे मटेरियल मिळविण्यासाठी Register for Online Study Material असे लिहिलेल्या चौकोनावर क्लिक करा. फॉर्म भरून नोंदणी केल्यावर तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड एसएमएसने आणि इमेलने पाठविला जाईल. तो वापरून Online Study Material Login असे लिहिलेल्या चौकोनावर क्लिक करून लॉगीन करा. हे ऑनलाईन स्टडी मटेरियल आपल्या परीक्षेची तयारी करण्यासाठी उपयुक्त आहेच; परंतु याचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय अभ्यासासाठीसुद्धा नक्की होईल.
डॉ. सी. व्ही. रमण बालवैज्ञानिक परीक्षा | Dr. C. V. Raman Pediatric Examination |
डॉ. सी. व्ही. रमण बालवैज्ञानिक परीक्षा | Dr. C. V. Raman Balvaidnyanik Examination उद्दिष्टे :
- विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयी अभिरुची, संशोधक वृत्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे.
- विद्यार्थ्यांमध्ये प्रायोगिक कौशल्य प्राप्त होण्यासाठी तसेच प्रकल्प निर्माण करण्यासाठी सुटे साहित्य उपलब्ध करू देणे.
- विद्यार्थाच्या निरीक्षण व अवलोकन क्षमतेला वाव.
- शास्त्रज्ञांचा प्रेरणात्मक जीवनांचा परिचय.
- बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना वैज्ञानिक कार्यशाळेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करू देणे.
डॉ. सी. व्ही. रमण बालवैज्ञानिक परीक्षा | Dr. C. V. Raman Balvaidnyanik Examination सूचना-
- डॉ. सी. व्ही. रमन बालवैज्ञानिक परीक्षा 2021 22 नावनोंदणी ( Registration ) सुरु
- डॉ. सी. व्ही. रमन बालवैज्ञानिक परीक्षा 2021 बाबत मागील वर्षी नोंदणी (Registration ) करून फी भरलेल्या विद्यार्थ्यांना या वर्षी शिकत असलेल्या वर्गात प्रवेश दिला जाईल. ( मागील वर्षी इ. 5 वी (सन 2020-21 ) च्या विद्यार्थ्यांना (सन- 2021-22 ) मध्ये इ 6 वी या प्रमाणे इ. 9 वी च्या मुलांना इ 10 वी मध्ये )
- सन 2021 -22 मध्ये डॉ. सी व्ही.रमन बालवैज्ञानिक परीक्षा साधारणत जानेवारी/ फेब्रुवारी मध्ये घेण्यात येईल.
- यावर्षी पासून परीक्षेचे दोन स्तर (Stage) करण्यात आले आहेत.
- पहिल्या स्तरावरची (First stage)परीक्षा जानेवारी /फेब्रुवारी महिन्यात ऑनलाइन घेतली जाईल. मुलांना घरी मोबाईल /संगणक/लॅपटॉप वर परीक्षा देता येईल
- पहिल्या स्तरावर परीक्षेत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या स्तरावरची (Second Stage)परीक्षा देता येईल.
- दुसऱ्या स्तरावर ची परीक्षा ऑफलाइन अथवा ऑनलाईन घेण्यात येईल.(परिस्थितीनुसार)
डॉ. सी व्ही रमण बालवैज्ञानिक परीक्षा पारितोषिक वितरण बाबत
- सन 2019 -20 चे पारितोषिक वितरण 15 सप्टेंबर पासून सुरू करण्यात येईल.
- तालुकास्तरावर पारितोषिक वितरण करण्याकरिता मार्गदर्शक शिक्षक अथवा तालुका प्रतिनिधी यांनी मुख्याध्यापक / संस्थाप्रमुख यांच्याशी चर्चा करून सुट्टीच्या दिवशी (रविवारी) शाळा उपलब्ध झाल्यास (शाळेचे १/२ वर्ग अथवा /हॉल, दोन /तीन तासा करिता ) बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरूपातील सुट्टे प्रयोग साहित्य देऊन प्रोजेक्ट तयार करून घेतले जातील.
- तसेच विद्यार्थ्यांचे सर्टिफिकेट व मेडल दिले जातील. (राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचीही बक्षिसे त्याच ठिकाणी दिले जातील)
- याकरिता मार्गदर्शक शिक्षक यांचे सहकार्य आवश्यक आहे.( कोरोना परिस्थितीमुळे असे करणे शक्य न झाल्यास , प्रतिनिधी /शिक्षका मार्फत , (बक्षिसे)प्रोजेक्ट किट, सर्टिफिकेट , मेडल दिले जातील.)
नवीन विद्यार्थ्यांची नाव नोंदणी सुरु आहे.
Linnks |
Click to go |
Register as Individual Student (विदयार्थी नोंदणी) |
|
Register as School (शाळा नोंदणी) |
|
Prospect (माहितीपत्रक) |
|
ISRO Tour (इम्रो सहल, थुम्बा / श्रीहरीकोट्टा) |
|
Register For Online Study Material (ऑनलाईन स्टडी मटेरियल) |
|
जिल्हा / तालुका प्रतिनिधी |
|
Official Website- https://drcvramanexam.in/ |
परीक्षा : फेब्रुवारी 2022
नाव नोंदणी सुरु अंतिम मुदत : 31 डिसेंबर 2021
🔹वैशिष्टे🔹
1. कार्यशाळेसाठी पात्र बालवैज्ञानिकांकडून नाविण्यपूर्ण वैज्ञानिक उपकरणे निर्मिती
2. शास्रज्ञांचे व मान्यवरांचे मार्गदर्शन व त्यांच्या हस्ते नाविण्यपूर्ण बक्षिसे जसे दूर्बीण,रोबोटिक्स व microscope, Solar Car, यासारखे Science Project दिले जातील.
3. विज्ञान नाटिका व लिक्विड नायट्रोजन प्रयोगाचे दिग्दर्शन
प्रिय विज्ञानप्रेमी विद्यार्थी मित्रांनो आपण डॉ.सी.व्ही रामन बालवैज्ञानिक परीक्षा आणि वैज्ञानिक कार्यशाळेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहात त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन !! तसेच आपणास मार्गदर्शन करून प्रेरणा देणारे मुख्याध्यापक ,शिक्षक व पालक यांनाही मनःपूर्वक धन्यवाद!
बालवैज्ञानिकांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यशाळेत इस्रो,टाटा इन्सिट्युट मुंबई ,आयसर यासारख्या नामवंत संस्थेतील शास्त्रज्ञ ,कुलगुरू जिल्हाधिकारी अशा मान्यवरांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते आणि प्रत्येक विद्यार्थ्यांकडून वैज्ञानिक उपकरणांची निर्मिती करुन नाविण्यपूर्ण बक्षिसे उदा.दूर्बिण रोबोट,मायक्रोस्कोप, सोलार कार यासारखे प्रोजेक्ट दिली जातात
🔭▪🔭▪🔭▪🔭▪
मागील वर्षी जिल्हा व तालुका गुणवत्ता यादीतील 1650 बालवैज्ञानिक कार्यशाळेसाठी पात्र ठरले.
Me time par exam nahi de pai to kya karu
उत्तर द्याहटवा