Easy result system
शाळांतर्गत अंतर्गत परीक्षांची निकालपत्रके (नियमावली / अंमलबजावणी) School Internal Examination Result Sheets (Rules / Implementation). इयत्ता १ ली ते ८ वी चा निकाल | इयत्ता पहिलीचा | इयत्ता दुसरीचा | इयत्ता तिसरीचा | इयत्ता चौथीचा | इयत्ता पाचवीचा | इयत्ता सहावीचा | इयत्ता सातवीचा | इयत्ता आठवीचा | इयत्ता नववीचा | इयत्ता दहावीचा | वार्षिक | निकाल तयार करणे | Excel शीट मध्ये रिझल्ट तयार करा |रिझल्ट बनवा आपल्या मोबाईलवर डाउनलोड केलेल्या Excel शीट मध्ये | वार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर | वार्षिक निकाल पत्रके | वार्षिक निकाल तयार करण्यासाठी अंतिम मूल्यमापन कार्य-योजना | 1 ली ते 8 वी चा रिझल्ट बनवाचे EXCEL साॅफ्टवेअर | सुधारित मूल्यमापन पद्धतीने | योजनेने निकाल पत्रक तयार करणे | सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीने निकाल तयार करणे | CCE | rte | cce result | Easy Result System
शाळा अंतर्गत परीक्षांची निकालपत्रके (नियमावली / अंमलबजावणी) School Internal Examination Result Sheets (Rules / Implementation)
Easy Result System (इयत्ता १ ली ते इयत्ता १० वी चा निकाल तयार करणे)
(अ) निरंतर मूल्यमापन
नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षेच्या रचनेत बदल
करण्यात आला
वर्षाचे चार
भाग पाडून
अध्ययन अध्यापनाचे मूल्यमापन वारंवार व्हावे
याकरिता चाचण्या
घेण्यात याव्यात
अशी तरतूद
'सेवाशर्ती नियमावली मध्ये करण्यात
आलेली आहे.
नवीन अभ्यासक्रमानुसार केवळ वार्षिक
परीक्षेच्या निकालाचा
विचार करून
विद्यार्थ्याला वरच्या
वर्गात घालण्यात
येत नाही.
त्याऐवजी विद्यार्थ्याचे सतत मूल्यमापन व्हावे या उद्देशाने त्याने
वर्षभरात होणाऱ्या
दोन घटक
चाचण्या व दोन सत्रान्त परीक्षा
ह्यांमध्ये मिळविलेल्या गुणांचा
एकत्रित विचार
करून त्याला
वरच्या वर्गात
संबंध निर्णय
केला जातो.
'घटक चाचणीमुळे शिक्षकांच्या अध्यापना 'परिणामकारकतेचे मोजमाप
होते.
शासनाने वेळोवेळी बदल केलेल्या सुधारित मूल्यमापन योजनांची अमलबजावणी करणे देखील महत्वाचे आहे.
"Easy Result System (इयत्ता १ ली ते इयत्ता १० वी चा निकाल तयार करणे)"
(आ) शासकीय तरतूद
सर्व माध्यमिक शाळांमध्ये अशा घटक
चाचण्या घे एकवाक्यता (युनिफॉर्मलिटी) असावी, म्हणून
सेवाशर्ती कायदा
नियमावलीमध्ये तरतूद
करून ठेवण्यात
आली ती याप्रमाणे...
- पहिल्या सत्रापूर्वी एक घटक चाचणी व,
- दुसन्या सत्रापूर्वी एक घटक चाचणी
अशा दोन
घटक चाचण्या
वर्षभरात घेतल्या
जात त्याचप्रमाणे प्रथम
सत्रान्त परीक्षा
व द्वितीय
सत्रान्त परीक्षा
अशा दोन
परीक्षा घ्याव्यात असा शासनाचा
नियम आहे.
घटक चाचणी
१. प्रथम
सत्र परीक्षा
घटक चाचणी
क्रमांक २ द्वितीय परीक्षा, भाषा
विषयाच्या तोंडी
परीक्षा शास्त्राची प्रात्यक्षिक परीक्षा, वर्षभरातील लेखनाचे
मूल्यमापन कार्यानुभव, समाजसेवा, स्काऊट/गाईड, शारीरिक शिक्षण व चित्रकला परीक्षा ह्या
सर्वांचे गुण नोंदविण्यात येतात
व संबंधित
विद्यार्थ्यांचे वार्षिक
निकालपत्रक दिने
जाते व त्यावरून तो उत्तीर्ण
किंवा अनुत्तीर्ण झाला ठरविण्यात येते. म्हणून
या पद्धतीला
परीक्षा पद्धती
न म्हणता
सततचे मूल्यमापन म्हणण्यात येते.
केवळ एका
परीक्षेतील गुणांचा
विचार क उत्तीर्णतेचा निर्णय
करण्याऐवजी वर्षभराच्या कामकाजाचा त्याचप्रमाने प्रात्यक्षिकांसह अन्य
सर्व परीक्षांमध्ये मिळविलेल्या गुणांचा
विचार करण्यात
येतो.
विद्यार्थ्यांने वर्षभर
सतत अध्ययन
करावे, त्याची
परीक्षेची भीती नाहीशी व्हावी हा या योजनेचा उद्देश
आहे.
एकवाक्यता असण्याच्या दृष्टीने सर्व
विषय-शिक्षकांची सभा घेऊन
मूल्यमापन पद्धती, गुणांकन पद्धती व नमुना गुणपत्रक नोंद
तक्ते यांची
माहिती त्यांना
द्यावी. या कामी प्रथम नियोजनपूर्वक घटकानुसार अध्ययन
प्रक्रिया शिक्षकांनी पूर्ण करावी.
प्रत्येक विद्यार्थ्याचे विषयानुरूप गुण संकलित करून अंतिम निकाल जाहीर करावयाचा असतो. याकरिता वर्गोन्नतीचे आदर्श नियम (माध्यमिक शाळा संहिता परिशिष्ट सात नियम-३७) अभ्यासणे आवश्यक आहे. निकाल एकदा जाहीर केल्यानंतर त्यात कोणताही बदल करू नये.
'Easy Result System'
वर्गोन्नतीचे आदर्श नियम
(१) शाळांनी घेतलेल्या लेखी व प्रात्यक्षिक, दोन्ही सहामाही/सत्र परीक्षेतील त्याच्या/तिच्या तोंडी परीक्षा, घटक चाचण्या गृहपाठ इत्यादींचा समावेश असलेल्या दोन सहामाही/सत्राच्या कार्याच्या आधारे वर्षाच्या शेवटी विद्यार्थ्याला एका इयत्तेवून दुसऱ्या इयत्तेत घालण्यात येईल. पहिल्या सत्राच्या शेवटची सत्र परीक्षा ही पहिल्या सत्रातील पाठ्यक्रमावर व दुसऱ्या सत्राच्या शेवटची सत्र परीक्षा ही दुसऱ्या सत्रातील पाठयक्रमावर आधारित राहील.
(२) विद्यार्थ्याने दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्याच्या प्रत्येक विषयात मिळविलेले गुण व प्रत्येक सत्रातील चाचणीमध्ये उत्तीर्ण होण्याच्या प्रत्येक विषयात मिळविलेले गुण एकत्र करून त्यांच्या सरासरीवर त्यास वरच्या वर्गात घातले जाईल व त्याची श्रेणी ठरविली जाईल. प्रत्येक विषयात ३५ टक्के गुण मिळवणारा विद्यार्थी वरच्या इयत्तेत पालण्यास पात्र ठरेल. एक किंवा एकाहून जास्त विषयात अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत जास्तीत जास्त १५ गुण क्षमापित केले जातील. मात्र हे क्षमापित गुण एका विषयात जास्तीत जास्त १०टक्के गुणांपेक्षा जास्त नसतील. यात अद्यावत नियमाचा विचार करण्यात यावा.
(३) (अ) पहिल्या सत्राच्या शेवटी घेण्यात आलेल्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण
(ब) दुसऱ्या सत्राच्या शेवटी
घेण्यात आलेल्या
लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण
(क) तोंडी परीक्षा, घटक
चाचण्या गृहपाठ, इत्यादी सत्रातील
गुण यांच्या
एकूण बेरजेस
तीनने भागून
उत्तीर्ण होण्याच्या प्रत्येक
विषयाच्या गुणांची
सरासरी काढली जाईल.
वरील (अ) (ब) आणि (क) यास समान गुण
असतील.
(४) विद्यार्थ्याने पहिल्या सत्र परीक्षेमध्ये मिळविलेले गुण व त्याचे कार्य पालकांना कळविले जाईल.
(५) गुण समापित करण्याचा लाभ हा फक्त वर्षाच्या शेवटी विद्यार्थ्यास एका इयत्तेतून दुसऱ्या इयत्तेत घालण्याच्या वेळी देण्यात येईल.
(६) जर एखादा विद्यार्थी त्याच्या नियंत्रणाबाहेरील कारणांमुळे कोणत्याही परीक्षेस उपस्थित राहू शकला नाही आणि उत्तीर्ण होण्याकरिता आवश्यक असलेल्या गुणांच्या किमान टक्केवारीपेक्षा कमी गुण त्याने मिळविले असतील तर मुख्याध्यापक/वर्गशिक्षक/विषयशिक्षक यांचा समावेश असलेली समिती त्याच्या/तिच्या सत्र कार्याच्या आधारे त्याला/तिला वरच्या इयत्तेत घालण्यासंबंधी निर्णय घेईल.
(शासन निर्णय, शिक्षण विभाग क्र. जीएसी १०७४/४७४० ई दिनांक ७ मे १९७४)
याकरिता प्रत्येक सत्रान्त परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वी वरील प्रमाणे परीक्षा समितीची स्थापना करण्यात यावी व त्यांच्या मार्फत निर्णय घेण्यात यावेत. सर्व निकालपत्रके इयत्तावार तयार झाल्यानंतर शिक्षणखात्याने जाहीर केलेल्या शेवटच्या शालेय कामाच्या दिवसाच्या कार्यालयीन वेळेत निकाल जाहीर करावेत.
जाहीर केलेल्या दिवशी व वेळेत निकाल जाहीर करावा.
दरवर्षी निकालाची फाईल स्वतंत्र ठेवावी. इयत्तावार निकालपत्रके लावून ठेवावीत. सर्व तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षांचे त विषयशिक्षकांनी लावलेले आहेत याची खात्री करून प्यावी.
विषय शिक्षकांच्या सह्या निकाल पत्रकावर असाव्यात. ‘बेरजा तपासाल्यात त्या बरोबर आहेत’ ह्या शेऱ्यावर दुसऱ्या शिक्षकांच्या सह्या घ्याव्यात.
फाईलच्या सुरुवातीला पुढे दिल्याप्रमाणे हमीपत्र लिहून ठेवावे त्यावर सर्व शिक्षकांच्या सह्या घ्याव्यात.
इयत्ता १ ली ते इयत्ता १० वी चा निकाल तयार करणे
हमीपत्र
माध्यमिक शाळा संहिता सुधारित आवृत्ती १९८६ (३१-१२-१९८६ पर्यंत सुधारित आवृत्ती) मधील परिशिष्ट सात वार्गोन्नतीचे आदर्श नियम मी/आम्ही वाचले असून ते समजावून घेतले आहेत. या नियमांच्या आधीन राहून विषयवार निकालपत्रके तयार केली आहेत.
संकलित निकालपत्रकातील बेरजा
(अ+ब+क एकूण गुण
व (अ+ब+क)/३ येणारे सरासरी गुण)
व सरासरी
वर्गशिक्षक / विषयशिक्षक मिळून केलेल्या
आहेत. त्या
तपासल्या आहेत
त्या बरोबर
आहेत. वर्गशिक्षक / विषय शिक्षक
१)..................... ( वर्गशिक्षक / विषय शिक्षक
यांची यादी)
२).....................
३).....................
सर्वात शेवटी प्रत्येक निकालपत्रकाच्या कागदावर मुख्याध्यापकाची सही व शिक्का असणे आवश्यक आहे.
शासनाने वेळोवेळी बदल केलेल्या सुधारित मूल्यमापन योजनांची अमलबजावणी करणे देखील महत्वाचे आहे.
"Easy Result System"
इयत्ता 1 ली ते इयत्ता 8 वी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन निकाल प्रणाली.
इयत्ता 9 वी व 10 वी करिता संगणीकृत निकाल प्रणाली.
शाळांतर्गत अंतर्गत परीक्षांची निकालपत्रके (नियमावली / अंमलबजावणी) School Internal Examination Result Sheets (Rules / Implementation). इयत्ता १ ली ते ८ वी चा निकाल | इयत्ता पहिलीचा | इयत्ता दुसरीचा | इयत्ता तिसरीचा | इयत्ता चौथीचा | इयत्ता पाचवीचा | इयत्ता सहावीचा | इयत्ता सातवीचा | इयत्ता आठवीचा | इयत्ता नववीचा | इयत्ता दहावीचा | वार्षिक | निकाल तयार करणे | Excel शीट मध्ये रिझल्ट तयार करा |रिझल्ट बनवा आपल्या मोबाईलवर डाउनलोड केलेल्या Excel शीट मध्ये | वार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर | वार्षिक निकाल पत्रके | वार्षिक निकाल तयार करण्यासाठी अंतिम मूल्यमापन कार्य-योजना | 1 ली ते 8 वी चा रिझल्ट बनवाचे EXCEL सोफ्टवेअर | सुधारित मूल्यमापन पद्धतीने | योजनेने निकाल पत्रक तयार करणे | सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीने निकाल तयार करणे | CCE | rte | cce result | Easy Result System
how to download excel file
उत्तर द्याहटवाhow to download excel file
उत्तर द्याहटवावर्गानुसार फाईल डाऊनलोड करा
हटवालिंक सापडत नाही
उत्तर द्याहटवासर आपण खूप सुंदर काम केलेत सोपे काम केले त्याबद्दल धन्यवाद एक विनंती 9 वी 10 वी साठी समाजशास्त्र ला पर्याय nsqf चे आहे का शीट असेल तर पाठवा ना सर
उत्तर द्याहटवा5 वि ६वि ७वि ८वि रीज्लट फाईल ओपन होत नाही सर नवीन फाईल पाठवा
उत्तर द्याहटवा५ वि ते ८ वि नवीन निकाल फाईल पाठवा सर अगोदरची ओपन होत नाही
उत्तर द्याहटवा