माझे+विद्यार्थी+माझी+जबाबदारी- majhe-vidyarthi-mazi-jababadari - my-students-my-responsibility कोविड -19 च्या प्रादुर्भावाच्या पार्...
माझे+विद्यार्थी+माझी+जबाबदारी-majhe-vidyarthi-mazi-jababadari-my-students-my-responsibility कोविड -19 च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी सातत्यपूर्ण अध्ययन आराखडा (Continuous LearningPlan) राबविणेसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करणेबाबत व त्याच्या अंमलबजावणीसाठी माझे विद्यार्थी माझी जबाबदारी अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविणेबाबत दि. 04 ऑक्टोंबर 2021 रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे.
माझे विद्यार्थी माझी जबाबदारी My-Students-My-Responsibility अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविणेबाबत मार्गदर्शन
24 सप्टेंबर च्या शासन निर्णयानुसार राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी आणि शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे शाळांचे वर्ग दि.04 ऑक्टोबर, 2021 पासून सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी शासन मान्यता देण्यात आलेली आहे. शासनाकडून जरी शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी वेळोवेळी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळा सुरू होत असल्या तरी इयत्ता पहिली ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग अद्याप नियमितपणे सुरू होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरु राहणार आहे. तसेच सुरु करण्यात आलेल्या ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वच शाळा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या नाहीत तर अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व विद्यार्थ्यांची सुरक्षितता व गुणवत्ता यासाठी अध्ययन-अध्यापन (शिक्षण) प्रक्रिया ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने सुरू राहणेकरिता राज्यातील शाळा, शिक्षक यांच्यासाठी "माझे विद्यार्थी माझी जबाबदारी या अभियानाच्या माध्यमातून सातत्यपूर्ण अध्ययन आराखड्याची (Continuous Learning Plan) अंमलबजावणी करण्यासाठी 4 ऑक्टोबर च्या शासन निर्णयान्वये विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत.
"माझे विद्यार्थी माझी जबाबदारी" अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविणेबाबत उपयुक्त लिंक्स
माझे विद्यार्थी माझी जबाबदारी सदर अभियानामध्ये विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण अध्ययन सुरू राहण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ आणि २०२१-२२ मध्ये राज्यस्तरावरून राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यानुसार अंमलबजावणी करिता मार्गदर्शक सुचना पुढे देण्यात आलेल्या आहेत. त्या संदर्भांप्रमाणे काही महत्वाच्या लिंक्स खालील दिलेल्या आहेत मार्गदर्शक सूचनांप्रमाणे लिंक्स उपयुक्त ठरतील.
"माझे विद्यार्थी माझी जबाबदारी"
अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविणेबाबत उपयुक्त लिंक्स |
|
माझे
विद्यार्थी माझी जबाबदारी अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविणेबाबतचा शासन निर्णय |
|
शैक्षणिक दिनदर्शिका |
|
अभ्यासमाला |
|
सेतू अभ्यासक्रम (ब्रीज कोर्स) |
|
दीक्षा अॅप |
|
दूरदर्शनवरील ज्ञानगंगा शैक्षणिक कार्यक्रम |
|
गोष्टींचा शनिवार |
|
पायाभूत भाषिक व अंकगणित साक्षरता विकसन कार्यक्रम
(निपुण भारत मिशन) |
|
ऑनलाईन समुपदेशन व महाकरिअर पोर्टल |
|
शिक्षक व विद्यार्थ्यांची सायबर सुरक्षा आणि
सुरक्षितता |
|
WhatsApp स्वाध्याय
उपक्रम |
|
इयता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विषयनिहाय
शंका समाधान सत्राचे आयोजन |
इयता दहावी Click Here बारावी Click Here |
स्वयम (SWAYAM) |
|
"शिकू आनंदे" उपक्रम |
|
किशोर गोष्टी |
|
सेतू अभ्यासक्रम (ब्रीज कोर्स) |
|
सेतू अभ्यासक्रम चाचण्या (ब्रीज कोर्स) |
|
विद्यार्थ्यांचे मूल्यमापन |
प्रश्पेढी |
बालभारती मोफत पुस्तके |
"माझे विद्यार्थी माझी जबाबदारी" या अभियानाचा उद्देश -
- विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण अध्ययनासाठी निर्गमित करणे.
- कोविड १९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी सातत्यपूर्ण अध्ययन आराखडा राबविणे.
- विद्यार्थ्यांना त्यांच्या डिजिटल सुविधांच्या उपलब्धतेनुसार सातत्यपूर्ण अध्ययन आराखड्याद्वारे शैक्षणिक सहाय्य करणे.
- माझे विद्यार्थी माझी जबाबदारी अभियानांतर्गत शिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षीय यंत्रणेतील घटक, अधिकारी आणि पालक यांच्या भूमिका व जबाबदारी निश्चित करणे.
- सरल प्रणालीद्वारे डिजिटल सुविधांच्या उपलब्धतेनुसार विद्यार्थ्याच्या सातत्यपूर्ण अध्ययनाचा मागोवा घेणे. (Tracking of Learning).
सातत्यपूर्ण अध्ययन आराखडा (Continuous Learning Plan)
कोविड १९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी सातत्यपूर्ण अध्ययन आराखडा (Continuous Learning Plan) तयार करण्यासंदर्भात खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत. सदर आराखड्याची अंमलबजावणी करत असताना शाळा, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक, समाज, पर्यवेक्षीय यंत्रणा या सर्वांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सदर अभियानामध्ये विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण अध्ययन सुरू राहण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ आणि २०२१-२२ मध्ये राज्यस्तरावरून राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. सदर उपक्रम आणि शाळास्तरावर राबविण्यात आलेल्या विशेष उपक्रमांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण अध्ययन आराखड्याचे नियोजन करावयाचे आहे.
सातत्यपूर्ण अध्ययन आराखडा तयार करताना प्रामुख्याने पुढील महत्त्वपूर्ण गोष्टींवर भर देण्यात यावा.
- डिजिटल साधनांच्या उपलब्धतेनुसार अध्ययन आराखड्याचे नियोजन.
- स्थलांतरित कामगारांची मुले विशेष गरजा असणारी मुले, आकांक्षित जिल्ह्यातील विद्यार्थ्याकरिता विशेष नियोजन.
- विद्यार्थी आणि शिक्षकांचे शारीरिक, मानसिक आरोग्य आणि स्वास्थ्य.
सातत्यपूर्ण अध्ययन आराखडा तयार करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना :
- सातत्यपूर्ण अध्ययनासाठी डिजिटल साधनांची उपलब्धतताबाबत सर्वेक्षण प्रत्येक शाळेने शाळेतील प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्यांजवळ असणाऱ्या डिजिटल उपकरणाची/ साधनांची उपलब्धता याबद्दल माहिती संकलित करावी. विद्यार्थीनिहाय अध्ययन आराखडा तयार करण्यासाठी संकलित माहितीच्या आधारे डिजिटल साधने उपलब्ध असणारे विद्यार्थी, गर्यादित स्वरूपात डिजिटल साधने उपलब्ध असणारे विद्यार्थी आणि कोणत्याही प्रकारचे/ स्वरूपात डिजिटल साधने उपलब्ध नसणारे विद्यार्थी यांची माहिती एकत्रित करावी.
- शैक्षणिक गरजांची सद्य:स्थिती: प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांच्या सद्य:स्थितीतील शैक्षणिक गरजांची निश्चिती पायाभूत चाचणीद्वारे/ निदानात्मक चाचणीद्वारे करून आशय, मूलभूत कौशल्य आणि अध्ययन निष्पत्तीची सद्य:स्थिती या आधारे सातत्यपूर्ण अध्ययन आराखड्याबाबत नियोजन करावे.
- विद्यार्थिनिहाय सातत्यपूर्ण अध्ययनासाठी नियोजन : दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे शैक्षणिक गरजा आणि डिजिटल साधनांच्या उपलब्धतेनुसार खालील विद्यार्थी गटानुसार प्रत्येक शाळेने सातत्यपूर्ण अध्ययनाचे नियोजन करावे.अ. डिजिटल साधने उपलब्ध असणारे विद्यार्थी (ऑनलाईन),ब. मर्यादित स्वरूपात डिजिटल साधने असणारे विद्यार्थी (ऑनलाईन + ऑफलाईन), क. कोणतेही डिजिटल साहित्य उपलब्ध नसणारे विद्यार्थी (ऑफलाईन)याप्रमाणे नियोजन करताना विशेष गरजा असणारे विद्यार्थी, स्थलांतरित कामगारांची मुले, आकांक्षित जिल्ह्यातील विद्यार्थी, वंचित घटकातील विद्यार्थी यांचा प्राधान्याने विचार करावा.
- सातत्यपूर्ण अध्ययन आराखड्यामध्ये (ऑनलाईन/ऑफलाईन) समाविष्ट करावयाचे घटक/बाबी :a. अध्ययन अध्यापन नियोजनb. वेळापत्रक c. उपस्थितीd. अध्ययन स्रोत/साहित्यe. अध्ययन अनुभूतींचे स्वरूपf. पालक सहभागg. मूल्यमापन आणि उपचारात्मक अध्ययन h. अभ्यासेतर उपक्रम नियोजनi. स्थलांतरित कामगारांची मुले/आकांक्षित जिल्ह्यातील विद्यार्थी / यांचेसाठी विशेष नियोजनj. शैक्षणिक मार्गदर्शन आणि समुपदेशन सुविधा ११. शारीरिक आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्यासाठी विशेष नियोजनk. स्थानिक परिस्थितीनुसार विशेष उपक्रम
कोविड कालावधीत राज्याने राबविलेले उपक्रम v:
1. शैक्षणिक दिनदर्शिका
2 . अभ्यासमाला:
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून इयत्ता पहिली ते बारावीच्या सर्व विषयासाठी दीक्षा अॅपच्या माध्यमातून "शाळा बंद पण शिक्षण आहे" ही अभ्यासमाला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. सदर सर्व अभ्यासमाला https://scertmaha.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. विशेष गरजाधिष्ठित विद्यार्थ्यांसाठीसुद्धा दैनंदिन अभ्यासमालेतून ई-साहित्य देण्यात येत आहे..
2. सेतू अभ्यासक्रम (ब्रीज कोर्स) :
विद्यार्थ्यांचा मागील शैक्षणिक वर्षातील अध्ययन -हास (learning loss) भरून काढण्यासाठी राज्यस्तरावरून इयत्तानिहाय व विषयनिहाय सेतू अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. सदर कोर्स परिषदेच्या https://scertmaha.ac.in
या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
3.दीक्षा अॅप:
5. दूरदर्शनवरील ज्ञानगंगा शैक्षणिक कार्यक्रम :
6. गुगल क्लासरूम ऑनलाईन प्रशिक्षण :
7. गोष्टींचा शनिवार :
विद्यार्थ्यांमधील वाचन कौशल्याच्या विकासासाठी व सर्व विद्यार्थ्यांसाठी श्रवणीय तसेच बोधात्मक अशा गोष्टीचे वाचन करणे यासाठी गोष्टींचा शनिवार या ऑनलाईन कार्यक्रमाची सुरुवात युनिसेफ व प्रथम संस्थेच्या मदतीने करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये दर शनिवारी श्रवणीय व वाचनीय गोष्टींची पुस्तके उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
8. पायाभूत भाषिक व अंकगणित साक्षरता विकसन कार्यक्रम (निपुण भारत मिशन)
राज्यातील पूर्व प्राथमिक ते इयत्ता तिसरी पर्यंतच्या १००% विद्यार्थ्यांच्या पायाभूत भाषिक व अंकगणितिय क्षमता विकसित होण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विविध प्रशिक्षण कार्यक्रम, विद्यार्थ्यांसाठी अध्ययन साहित्य इ. ची निर्मिती करण्यात येत आहे. तसेच शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती यांच्यासाठी वेळोवेळी उपक्रमविषयक मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येतील. त्यामध्ये प्रत्येक मुलाने भाषा आणि गणित या विषयाच्या पायाभूत क्षमता संपादित करण्यावर भर देण्यात आलेला आहे. सदर करिता शिक्षक सक्षमीकरण अंतर्गत निष्ठा ३.० अंतर्गत राज्यातील इयत्ता पहिली ते पाचवीच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
9. ऑनलाईन समुपदेशन व महाकरिअर पोर्टल
आवश्यक माहिती तसेच १६ देशांतील १२०० शिष्यवृत्तीच्या प्रकारांची माहिती http://mahacareerportal.com या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये सदर पोर्टलच्या माध्यमातून ११५० विविध प्रवेश परीक्षांबाबत माहिती दिली जाणार आहे. तसेच राज्यातील जिल्हानिहाय ४२६ प्रशिक्षित समुपदेशक विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांसाठी करिअरविषयक १५ मार्गदर्शन सत्रांचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले असून सर्व ऑनलाईन सत्र परिषदेच्या यू-ट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. राज्यस्तरावरून महाकरिअर पोर्टलच्या माध्यमातून इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एकूण ५५५ कोर्सेस उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. २१००० महाविद्यालयांची संक्षिप्त
10 . शिक्षक व विद्यार्थ्यांची सायबर सुरक्षा आणि सुरक्षितता
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक काळजी व उपाययोजना याबाबत ऑनलाईन सत्रांचे आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत करण्यात येत आहे.https://youtu.be/LfSgvWqDJqk
11. स्वाध्याय उपक्रम:
स्वाध्याय उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत निवडक विषयांचे प्रश्न व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पोहोचविण्यात येत आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये या उपक्रमाच्या स्वरूपामध्ये काही बदल करून इतर विषयांचा समावेश करून सदर उपक्रम राबविण्यात येत आहे. WhatsApp स्वाध्याय उपक्रम
12. इयता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विषयनिहाय शंका समाधान सत्राचे आयोजन
इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षाचा कालावधी लक्षात घेता या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या दृष्टीने तज्ञ शिक्षकामार्फत मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले होते. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये या विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण अध्ययन सुरू रहावे या दृष्टीने सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.
13. प्रश्नपेढी
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांच्या मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमाच्या प्रश्नपेढी https://scertmaha.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अध्ययन निष्पत्तीनिहाय प्रश्रपेढी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
14. पूरक अध्ययन साहित्य
विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी छापील स्वरूपात पूरक अध्ययन साहित्य राज्यस्तरावरून विकसित करण्यात आले आहे. यामध्ये वयानुरूप प्रवेशित मुलांसाठी विद्यार्थी मित्र पुस्तिका, इयत्ता पहिली व दुसरीच्या सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी “करूया मैत्री गणिताशी कार्यपुस्तिका इ. चा समावेश आहे. या साहित्याचा विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण अध्ययन होण्यास उपयोग होणार आहे.
15. स्वयंम पोर्टल:
शिक्षकांचा व्यावसायिक विकास व विषय ज्ञान समृद्धीकरिता दीक्षा व स्वयम (SWAYAM) हे मोफत प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपातील मोफत कोर्सेस देण्यात आलेले आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठीही शैक्षणिक आशय घटकांवरील कोर्स आहेत. या सर्वांचा वापर विद्यार्थी व शिक्षक करू शकतात.
16. "शिकू आनंदे" उपक्रम:
कोविडच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा बंद व लॉकडाऊनमुळे खेळण्याच्या वयात मुले घरात बंदिस्त झाल्याने अनेक प्रकारच्या शारीरिक व मानसिक समस्या मुलांमध्ये निर्माण होऊ शकतात, या बाबींचा विचार करून इ. पहिली ते आठवीच्या वर्गात अध्ययन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत दर शनिवारी दि. ३ जुलै २०२१ पासून ऑनलाईन पद्धतीने "शिकू आनंदे" (Learn with Fun) हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. परिषदेच्या यू-ट्यूब चैनलद्वारे राज्यातील सर्व इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम दर शनिवारी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत प्रसारित करण्यात येतो.
17. शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण आणि बालरक्षक चळवळ :
विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन व ऑनलाईन माध्यमातून सातत्यपूर्ण अध्ययनासाठी निश्चित आराखडा तयार करण्यासाठी सद्य:स्थितीमध्ये शाळा व शिक्षक वरीलप्रमाणे उल्लेख केलेल्या शैक्षणिक उपक्रमांचा, स्थानिक परिस्थितीनुसार राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा, तसेच संदर्भ क्र. १ नुसार "घरी राहून शिक्षण" (Leaming from Home) परिपत्रकाद्वारे देण्यात आलेल्या शासनाच्या महत्त्वाच्या विविध संकेतस्थळे, पोर्टल, प्लॅटफॉर्म आणि शैक्षणिक अॅप्लिकेशन्सचा वापर करू शकतात.
सातत्यपूर्ण अध्ययन आराखडा अंमलबजावणीमधील शाळा व शिक्षकांची भूमिका व जबाबदारी
उपरोक्त सातत्यपूर्ण अध्ययन आराखडा (Continuous Learning Plan) ची अंगलबजावणी करण्यासाठी शाळा आणि शिक्षक यांची भूमिका व जबाबदारी पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे. सदर जबाबदारी पार पाडताना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सर्व नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
१. विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाचे विविध स्रोत उपलब्ध करून द्यावेत. डिजिटल माध्यमांचा वापर करून अध्ययन करणेबाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकातील सूचनांचे पालन करून याबाबत पालकांना देखील प्रोत्साहित करावे.
२. विद्यार्थ्यांच्या शंका/समस्यांचे फोनद्वारे किंवा इतर माध्यमांद्वारे वेळोवेळी शंका निरसन करावे.
३. एकही विद्यार्थी पाठ्यपुस्तकापासून वंचित राहणार नाही यासाठी पाठपुरावा करावा. तसेच सर्व पाठ्यपुस्तके www.ebalbharti.in या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
५. शिक्षकांनी बीज कोर्समधील चाचण्या विद्यार्थ्यांकडून वेळेनुसार सोडवून घ्याव्यात आणि त्या तपासून त्याच्या गुणांच्या नोंदी संकलित करून ठेवाव्यात. ब्रीज कोर्समधील चाचण्या
७. शिक्षकांनी विविध ऑनलाईन साधने, टी. व्ही. रेडिओ व इतर विविध साधनांचा वापर अध्ययन अध्यापनासाठी कौशल्याने करून याबाबत विद्यार्थी आणि पालक यांनाही अवगत करावे.
८. शिक्षक ऑनलाईन साधनांद्वारे अध्ययन अध्यापन करत असल्यास विद्यार्थ्यांना दोन तासिकांमध्ये पुरेसा मोकळा वेळ द्यावा.
९. विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष देण्यात यावे. विशेष गरजा असणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना विश्वासात घेऊन त्याच्याकरिता पूरक उपक्रम राबविण्यात यावेत.आवश्यकतेनुसार जिल्ह्यातील विशेष विषय साधन व्यक्तींची शैक्षणिक सहाय्य घेण्यात यावे.
१०. राज्यस्तरावरून पुरविले जाणारे अध्ययन साहित्य समाज संपर्क माध्यमातून विद्यार्थी आणि पालक यांच्यापर्यंत पोहोचविण्यात यावे. यासाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, गावातील सुशिक्षित व्यक्ती आणि स्वयंसेवक यांची मदत घ्यावी.
१३. ऑनलाईन अध्ययनामुळे विद्यार्थी शाळेपासून खूप काळ दूर असल्याने शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी विविध आनंददायी कृतींचे आयोजन ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने करण्यात यावे.
१४. वर्षभर इयत्तानिहाय व विषयनिहाय घटक चाचण्यांचे ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आयोजन करून विहीत निकषांच्या आधारे मूल्यमापन करावे.
१५. प्रत्येक मुलासाठी डिजिटल उपकरणांच्या उपलब्धतेनुसार मॅपिंग करून मर्यादित साधनांची उपलब्धता असणाऱ्या मुलांवर अधिक लक्ष केंद्रित करावे.
१६. शिक्षकांनी एकही मूल शाळाबाह्य राहणार नाही याची दक्षता घ्यावी. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
१७. शिक्षक व पालकांचे Self Help Groups तयार करून शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने शाळेच्या आवश्यकतेनुसार पालकांची मदत घेण्यात यावी.
ऑफलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यात शाळा व शिक्षकांची भूमिका व जबाबदारी :
१. इंटरनेट सुविधा उपलब्ध नसणाऱ्या ठिकाणी शिक्षकांनी गृहभेटीच्या माध्यमातून पीडीएफ, कार्यपुस्तिका इ. साहित्य प्रिंट स्वरूपात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे. चार ते पाच विद्यार्थ्यांचे गट करून त्यांना मार्गदर्शन करावे.
२. शिक्षक मित्र, विद्यार्थी मित्र, स्वयंसेवक यांनी विविध माध्यमांतून उदाः गावातील लाऊडस्पीकर इ. च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्याचा प्रयत्न करावा.
३. विद्यार्थ्यांना ऑफलाईन स्वरूपातील ई-साहित्य उपलब्ध करून द्यावे.
४. दूरध्वनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सतत संपर्कात राहून त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन करावे.
सातत्यपूर्ण अध्ययन आराखडा अंमलबजावणीमधील मुख्याध्यापकांची जबाबदारी :
मुख्याध्यापकांनी शाळेतील सर्व शिक्षकांच्या मदतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन/ऑफलाईन माध्यमातून सुरू राहील यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत. शाळेतील सर्व शिक्षक १००% विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहतील याची दक्षता घ्यावी. यासाठी आवश्यकता भासेल त्याप्रमाणे गृहभेटी, कट्टा शाळा इत्यादी व यांसारख्या उपक्रमांचे आयोजन कोविड - १९ संदर्भात आवश्यक काळजी घेऊन करण्यात यावे.
सातत्यपूर्ण अध्ययन आराखडा अंमलबजावणीमधील पर्यवेक्षीय यंत्रणेची जबाबदारी :
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमधील प्राचार्य, चरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, विषय सहाय्यक, शिक्षणाधिकारी, शिक्षण • निरीक्षक, प्रशासन अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख विषय साधन व्यक्ती, विशेष विषय साधन व्यक्ती इ. पर्यवेक्षीय यंत्रणांनी सातत्यपूर्ण अध्ययन आराखडा (Continuous (Learning Plan) च्या अंमलबजावणीसाठी त्या त्या स्तरावर शाळा आणि शिक्षक यांना आवश्यक ते सहकार्य करावे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने आवश्यक शैक्षणिक मदत व आवश्यक ते सहकार्य करावे. तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी यांनी विद्यार्थिनिहाय उपलब्ध संसाधनांची माहिती सरल प्रणालीवर विहित मुदतीमध्ये अद्ययावत करणेबाबत वेळोवेळी पाठपुरावा करावा.
सातत्यपूर्ण अध्ययन आराखडा अंमलबजावणीमधील पालक व समाजाची भूमिका व जबाबदारी :
१. शिक्षकांनी वेळोवेळी विद्यार्थी आणि पालक यांच्या संपर्कात रहावे.
३. शाळेतून उपलब्ध करून दिले जाणारे साहित्य, चाचण्या, पुस्तके इ. घेण्यासाठी कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून पालकांनी शाळेत उपस्थित रहाणेसाठी प्रयत्न करावेत.
४. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून शक्य असल्यास आपल्या पाल्यांना अभ्यासासाठी सामुदायिक केंद्रावर पाठविण्यासाठी पालकांना प्रोत्साहन द्यावे,
५. आपल्या पाल्याचे अध्ययनासंबंधित प्रश्न / समस्या शिक्षकापर्यंत पोहोचवून त्यांचे मार्गदर्शन घेऊन त्यानुसार पाल्याला मदत करावी..
६. मुलांना शारीरिक व्यायाम, नृत्य, संगीत, नाटक, चित्रकला, सर्जनशील लेखन, वाचन इत्यादींसाठी घरी संधी उपलब्ध करून द्यावी व त्यासाठी मार्गदर्शन करावे. घरातील छोट्या छोट्या बाबींमधून प्रत्यक्ष अनुभव द्यावेत. उदा. घरकामात मदत, हिशोब करणे, गोष्टी सांगणे वगैरे.
विद्यार्थ्यांचे मूल्यमापन :
२. सदर मूल्यमापन सोयीनुसार ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने करण्यात यावे.
३. प्रत्येक विद्यार्थ्याच्या वेळोवेळी केलेल्या मूल्यमापनाच्या नोंदी शालेय स्तरावर हार्ड / सॉफ्ट कॉपी स्वरूपात जतन करून ठेवण्यात याव्यात. भविष्यात विद्यार्थ्याची संपादणूक पातळी निश्चित करण्यासाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो.
४. प्रत्येक विद्यार्थ्याचे ऑफलाईन/ऑनलाईन माध्यमातून मूल्यमापन करण्याची जबाबदारी शिक्षकांची राहील.
५. प्रत्येक विद्यार्थ्याचे नियमित मूल्यमापन केले जाण्यासाठीचे आवश्यक नियोजन व प्रत्यक्ष कार्यवाही करून घेण्याची जबाबदारी संबंधित शाळा व मुख्याध्यापक यांची राहील.
सरल प्रणालीवर विद्यार्थी अध्ययनासाठी उपलब्ध साधनांचा तपशील आणि मूल्यमापन या संदर्भात माहिती भरताना करावयाची कार्यवाही :
"माझे विद्यार्थी माझी जबाबदारी" अंतर्गत उत्तम काम करणाऱ्या शाळा व शिक्षक यांना प्रोत्साहन
१. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व पर्यवेक्षीय यंत्रणा यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांशी संपर्क ठेवून आपल्या कार्यक्षेत्रात विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण अध्ययन सुरु राहण्यासाठी शाळा स्तरावर करण्यात येत असलेले उत्तम उपक्रम प्रसार माध्यमाद्वारे प्रसिध्द करावेत.
२. राज्यस्तरावरून देखील शाळा व शिक्षकांच्या यशोगाथा जीवन शिक्षण मासिकाच्या माध्यमातून व इतर प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येतील.
३. प्रत्येक विद्यार्थ्याचे सातत्यपूर्ण अध्ययन होण्यासाठी शाळास्तरावर विद्यार्थ्यांची ऑनलाईन व ऑफलाईन सरासरी उपस्थितीची टक्केवारी सातत्यपूर्ण अध्ययन अध्यापन सातत्यपूर्ण मूल्यमापन, अध्ययन अध्यापनात कला व खेळ यांचा एकात्मिक वापर, सरल प्रणालीवरील आवश्यक नोंदी आणि नाविन्यपूर्ण कल्पनांची अमलबजावणी या निकषांच्या आधारे शैक्षणिक वर्षाच्या शेवटी जिल्हा व महानगरपालिका स्तरावर शाळांचे गुणांकन व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षक व शाळा यांना सन्मानित करण्याची कार्यपद्धती/ योजना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे मार्फत जाहीर करावे.
माझे+विद्यार्थी+माझी+जबाबदारी-majhe-vidyarthi-mazi-jababadari-my-students-my-responsibility |
COMMENTS