नवीन वाढीव महागाई भत्त्यानुसार आपला पगार किती होईल काढा काही सेकंदात Expected-DA-Calculator. पगार कसा काढावा ? पगार काढण्याची सोपी पद्धत
कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार.... साडे दहा किंवा 11 महिन्याचे...
31% महागाई भत्त्यानुसार आपला पगार काढा काही सेकंदात Expected-DA-Calculator...
31% महागाई भत्त्यानुसार आपला पगार काढा काही सेकंदात Expected-DA-Calculator |
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दिनांक १ जुलै, २०२१ पासून सुधारणा करण्याबाबत…..
संदर्भ-महाराष्ट्र शासन वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक: ममवा-१३२१/प्र.क्र.१४/ सेवा-९, मंत्रालय, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक : ३० मार्च २०२२
महागाई भत्ता 28 वरून 31 टक्के व फरक.pdf
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक १ जुलै, २०२१ ते दिनांक ३० सप्टेंबर, २०२१ या कालावधीत अनुज्ञेय महागाई भत्ता वाढीची थकबाकी मंजूर करण्याबाबत...
शासन निर्णय
१. शासन निर्णय समक्रमांक, दिनांक ७ ऑक्टोबर, २०२१ अन्वये राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर दिनांक १ जुलै, २०२१ पासून १७% वरुन २८% असा सुधारित करण्यात येऊन दिनांक १ ऑक्टोबर, २०२१ पासून सदर महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच या सुधारणेनुसार दिनांक १ जुलै, २०२१ ते दिनांक ३० सप्टेंबर, २०२१ या ३ महिन्यांच्या कालावधीतील अनुज्ञेय थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला होता.
२. शासन आता असे आदेश देत आहे की, राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक १ जुलै २०२१ ते दिनांक ३० सप्टेंबर, २०२१ या ३ महिन्यांच्या कालावधीतील ११% महागाई भत्ता वाढीच्या थकबाकीची रक्कम माहे मार्च, २०२२ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी.
३. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे त्याचप्रकारे यापुढेही लागू राहील.
४. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. अनुदानप्राप्त • संस्था व जिल्हा परिषद कर्मचा-यांच्या बाबतीत, संबंधित मुख्य लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उप लेखाशीर्षांखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२२०३३०१४५११२२८०५ हा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे..
संदर्भ-महाराष्ट्र शासन वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक: ममवा-१३२१/प्र. क्र. १४/सेवा-९, मंत्रालय, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०००३२, दिनांक ३० मार्च, २०२२
11% महा. भत्ता फरक रोखीने.pdf
Expected-DA-Calculator
कर्मचाऱ्यांना दिलेला भत्ता महाराष्ट्र शासन सुद्धा काही कालावधीने फरकासह देत असते, यासाठी आमच्याकडे एक वेब calculator उपलब्ध असून त्यात फक्त बेसिक type केल्यावर 31% महागाई भत्त्यानुसार आपला पगार अचूक calculate होतो ही बातमी व calculator ची लिंक मिळवण्यासाठी खालील लिंक ला टच करा
Click Here
पहा तुमचा पगार महागाई भत्ता फरक काढण्यासाठी Calulator
✳️ नवीन वाढलेल्या महागाई भत्त्यानुसार पगार काढण्यासाठी खालील Step करा.
➡️ सुरवातीस खाली दिलेल्या Link ला Click करा.
➡️ सध्याचे मूळ वेतन ( बेसिक ) टाईप करा Type You Basic Since Jully 2021.
➡️ महागाई भत्ता D.A. टक्केवारी टाईप करा . महागाई दर 31% आहे.
➡️ घरभाडे टक्केवारी HRA टाईप करा.
➡️ वाहन भत्ता ( TA ) दर टाईप करा.
➡️ सर्वात शेवटी Go या बटनावर क्लिक करा.
माहित करून घ्या काय आहे महागाई भत्ता??? (Dearness Allowance – DA)???
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
मार्गदर्शक व्हिडीओ https://youtu.be/S8XO0lOM0Eo
या फ्री व सोप्या calculator ची आवश्यकता सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांना असणार आहे यासाठी हि माहिती सर्वत्र शेअर करा
Tag- 7th Pay Commission | DA Calculator | महागाई भत्ता शासन निर्णय 2021| महागाई भत्ता calculator |महागाई भत्ता वाढ तक्ता pdf |राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्ता महाराष्ट्र
11% आणि 3% महागाई भत्ता फरक | DA Diff. Excel chart | सर्वांचा एकत्र DA काढा 1 मिनिटात | SHALARTH
संपूर्ण व्हिडिओ पहा व Excel sheet download करून लगेच तुमचा फरक काढा.👇🏼
COMMENTS