राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा, NMMS Exam Registration, अर्ज करण्याची पध्दत, पात्रता, वेळापत्रक, निवड, विषय, माध्यम
NMMS Exam registration- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अंतर्गत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी इयत्ता ८ वी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. सदर परीक्षा रविवार, २२ डिसेंबर २०२४ रोजी होणार आहे.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२४-२५
अधिसूचना तपशील:
- परीक्षा परिषद: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
- पत्ता: महाराष्ट्र राज्य माध्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कार्यालय, इमारत दुसरा व चौथा मजला, सर्व्हे नं. ८३२ ए, भांबुर्डा, शिवाजी नगर, पुणे- ४११००४
- संपर्क क्र.: ०२०-२९७०९६१७
- ई-मेल: mscepune@gmail.com
- संकेतस्थळ: www.mscepune.in व www.mscenmms.in
- अर्ज सुरु होण्याची तारीख: ०५ ऑक्टोबर, २०२४
NMMS Exam Registration अर्ज प्रक्रिया:
परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्रे mscepune.in व mscenmms.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. इच्छुक विद्यार्थी व पालकांनी या संकेतस्थळावर जाऊन सर्व आवश्यक माहिती व सूचना तपासून ऑनलाईन अर्ज भरावा.
NMMS Exam Registration महत्वाची माहिती:
परीक्षेची संपूर्ण माहिती, माहितीपत्रक आणि अर्ज भरताना लागणाऱ्या सूचना परीक्षेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज सादर करण्याची दक्षता घ्यावी.
ही महत्त्वपूर्ण अधिसूचना आपल्या परिचितांना तसेच पात्र विद्यार्थ्यांना वेळेत मिळवून देण्यासाठी पोस्ट शेअर करा आणि अधिक माहितीकरिता परीक्षेच्या संकेतस्थळास भेट द्या.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी इयत्ता ८ वी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली आहे. सदर परीक्षा २२ डिसेंबर २०२४ रोजी होणार आहे. योजनेचे उद्दिष्टे व परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे:
१. योजनेची उद्दिष्टे:
- प्रज्ञावान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य: इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील बुध्दिमान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळविण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवणे.
- उच्च माध्यमिक शिक्षणाला प्रोत्साहन: विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण घेण्यास मदत करणे.
- विद्यार्थ्यांची बुध्दिमत्ता विकसित करणे: विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास करून राष्ट्रसेवेतील योगदानासाठी त्यांना सुसज्ज करणे.
२. परीक्षेचे स्वरूप:
- परीक्षा सुरूवात: केंद्रशासनाच्या शिक्षण मंत्रालय (MoE), भारत सरकार, नवी दिल्ली मार्फत २००७-०८ पासून ही योजना सुरु झाली आहे. महाराष्ट्रात ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली २२ डिसेंबर २०२४ रोजी विविध जिल्हा केंद्रांवर घेतली जाईल.
- शिष्यवृत्तीचे आर्थिक लाभ: पात्र विद्यार्थ्यांना दरमहा रु. १०००/- (वार्षिक रु. १२०००/-) शिष्यवृत्ती दिली जाईल.
३. पात्रता:
- A. इयत्ता ८ वी मध्ये शिकणारे विद्यार्थी: महाराष्ट्रातील शासकीय, शासनमान्य अनुदानित किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांतील नियमित विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहेत.
- B. पालकांचे वार्षिक उत्पन्न: विद्यार्थ्यांच्या पालकांचे (आई व वडील मिळून) वार्षिक उत्पन्न ३,५०,०००/- पेक्षा कमी असावे. नोकरीत असणाऱ्या पालकांनी आपल्या आस्थापनाचे प्रमुखांकडून उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक आहे.
- C. इ. ७ वी मध्ये किमान गुण: विद्यार्थीने इ. ७ वी मध्ये किमान ५५% गुण मिळवलेले असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) विद्यार्थ्यांसाठी किमान गुणांची मर्यादा ५०% आहे.
- D. परीक्षेस बसता येणारे परंतु शिष्यवृत्तीस अपात्र विद्यार्थी:
- विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी
- केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थी
- जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थी
- शासकीय वसतिगृहाच्या लाभार्थी विद्यार्थी
- सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी
The above site is not accessible
उत्तर द्याहटवा