शालेय आरोग्य कार्यक्रम (School Health Programme) प्रशिक्षणासाठी शाळा व प्रशिक्षणार्थी मुख्याध्यापक व शिक्षक यांची लिंकद्वारे नोंदणी करणेबाबत.
नोंदणी दि. १८/०३/२०२२ ते २२/०३/२०२२ प्रशिक्षण दि.२३/०३/२०२२ ते २६/०३/२०२२ विषय: आयुष्मान भारत योजनेंतर्गत शालेय आरोग्य कार्यक्रम (School Health Programme) प्रशिक्षणासाठी शाळा व प्रशिक्षणार्थी मुख्याध्यापक व शिक्षक यांची लिंकद्वारे नोंदणी करणेबाबत.
संदर्भ:१. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे पत्र क्र२०१९/२४/१२०१५-M.No. O.DAHद.०९/१०/२०२०. ३. मा. संचालक प्रस्तुत कार्यालय व मा. अतिरिक्त संचालक, आरोग्य विभाग, पुणे यांची ऑनलाईन सभा दि. १५/०३/२०२२२. जा.क्रं. राकुकका/AH/SHP/Fund transfer letter/२०२१-२२ कक्ष ७ अ / नस्ती क्र.२३/१२२५६-१२२५८/२०२२ दि.१८०२/२०२२.school-health-program-under-ayushman-bharat-yojana
संदर्भ:१. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे पत्र क्र२०१९/२४/१२०१५-M.No. O.DAHद.०९/१०/२०२०. ३. मा. संचालक प्रस्तुत कार्यालय व मा. अतिरिक्त संचालक, आरोग्य विभाग, पुणे यांची ऑनलाईन सभा दि. १५/०३/२०२२२. जा.क्रं. राकुकका/AH/SHP/Fund transfer letter/२०२१-२२ कक्ष ७ अ / नस्ती क्र.२३/१२२५६-१२२५८/२०२२ दि.१८०२/२०२२.school-health-program-under-ayushman-bharat-yojana
शालेय आरोग्य कार्यक्रम
School Health Programme
भारत सरकारने आयुष्मान भारत योजनेंतर्गत संपूर्ण देशात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि केंद्रीय शालेय शिक्षण मंत्रालय यांचेमार्फत शालेय आरोग्य कार्यक्रम ( School Health & Wellness Programme) सुरु केला आहे. तदनुषंगाने राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग आणि शालेय शिक्षण विभाग यांच्या समन्वयाने आपल्या राज्यातील ठाणे, जालना, पालघर, नाशिक, यवतमाळ, हिंगोली, अहमदनगर या सात जिल्ह्यातील इयत्ता ६ वी ते १२ वी •पर्यंतच्या शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शासकीय अनुदानित शाळांमध्ये सदर कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
आयुष्मान भारत योजनेंतर्गत शालेय आरोग्य कार्यक्रम (School Health Programme) |
आयुष्मान भारत योजनेंतर्गत शालेय आरोग्य कार्यक्रम
(School Health Programme)
याअंतर्गत उपरोक्त जिल्ह्यातील इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व शासकीय अनुदानित प्रकारच्या प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक, एक पुरुष शिक्षक व एक महिला शिक्षिका असे एकूण तीन व्यक्तींना आरोग्यवर्धिनी दूत (School Health and Wellness Ambassador) म्हणून online प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
नोंदणी कालावधी
उपरोक्त जिल्हातील प्राचार्य, • जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षणाधिकारी माध्यमिक / प्राथमिक यांनी समन्वयाने आपल्या जिल्ह्यातील इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या शासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शासकीय अनुदानित शाळांमधील मुख्याध्यापक, एक पुरुष शिक्षक व एक महिला शिक्षक (ज्या शाळेत महिला शिक्षक नाही त्या शाळेतील दोन पुरुष शिक्षक) यांची १००% नोंदणी दि. १८/०३/२०२२ ते २२/०३/२०२२ या कालावधीत करणे अनिवार्य आहे. प्रत्येक तालुक्यातील निकषातील शाळा मुख्याध्यापक व शिक्षकांची पुढील लिंकद्वारे विहित कालावधीत नोंदणी करणेबाबतची संपूर्ण कार्यवाही करावी. सदर नोंदणी करत असताना सोबत जोडलेल्या माहितीपत्रकातील मार्गदर्शक सूचनांचे अवलोकन करणेबाबतच्या सूचना मुख्याध्यापक व शिक्षक यांना आपल्या स्तरावरून निर्गमित करण्यात याव्या.
प्रशिक्षण कालावधी
नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थी यांचे प्रशिक्षण दि.२३/०३/२०२२ ते २६/०३/२०२२ या कालावधीत ऑनलाईन स्वरुपात आयोजित करण्यात येणार आहे. तसेच सदर प्रशिक्षणासाठी लागणारे प्रशिक्षण साहित्य/घटकसंच पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रशिक्षणाचे वेळापत्रक यथावकाश पोर्टलवर उपलब्ध करून दिले जाईल. नोंदणीसाठी लिंक: https://shp.seertmaha.ac.in
संदर्भ- जा.क्र. राशैसंप्रपम / सा.शा./२०२२/1358 दि. १७/०३/२०२२ उपसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे. यांचे परिपत्रक
COMMENTS