इ. 1 लीला दाखल होणाऱ्या बालकांसाठी 'स्टार्स' प्रकल्पांतर्गत शाळापूर्व तयारी अभियान | Shala Purv Tayari Abhiyan उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
शाळा पूर्वतयारी 2024 - 25, शाळा पूर्वतयारी घोषवाक्य, शाळा पूर्वतयारी मेळावा, शाळा पूर्वतयारी मेळावा कसा साजरा करावा?शाळा पूर्वतयारी अभियान संपूर्ण माहिती येथे पहा, 1.शाळा पूर्वतयारी मेळावा Gr pdf download 2. मेळावा पायऱ्या pdf download 3. मेळाव्यातील घोषवाक्य pdf download 4. पालकांसाठी 12 मराठी आयडिया कार्ड pdf download 5. मुलांसाठी वर्कशीट बुक pdf download 6. मेळावा अभियान बॅनर pdf download 7.स्वयंसेवकांना सहभागाचे प्रमाणपत्र download , 8. अभियान पहिले पाऊल 49 पानांची मार्गदर्शिका download 9. शाळा पूर्वतयारी विकास पत्र pdf download, School Readiness Campaign
शाळा पूर्वतयारी अभियान PDF 2024-25 | शाळापूर्व तयारी प्रशिक्षण/ मेळावा क्र. 1 व 2 चे आयोजन करणेबाबत परिपत्रक | संपूर्ण माहिती व PDF
मागील वर्षी एप्रिल २०२३ ते जून २०२३ या कालावधीत, इयत्ता पहिलीसाठी "शाळापूर्व तयारी अभियान" या कार्यक्रमांतर्गत "पहिले पाऊल" राज्यात आणि STARS २०२४-२५ संदर्भ १ या कार्यक्रमानुसार या शैक्षणिक सत्रातील इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणार्या बालकांसाठी "शाळापूर्व तयारी अभियान" ची अंमलबजावणी केली जाईल.
शाळापूर्व तयारी अभियान २०२४-२५ ची यशस्वी अंमलबजावणी करणेबाबत.
संदर्भ : १. STARS २०२४-२५ PAB मान्यतेचे पत्र दि. ३१ मार्च २०२४.
शाळापूर्व तयारी प्रशिक्षण
सन 2024-25 मध्ये इयत्ता पहिलीला दाखल होणाऱ्या बालकांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे, महाराष्ट्र शासन, यांचे मार्फत शाळापूर्व तयारी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विभागस्तर प्रशिक्षणानंतर प्रशिक्षकांचे तालुकास्तर प्रशिक्षण व शाळापूर्व तयारी मेळावे आयोजन करणेसाठी शिक्षक व अंगणवाडी सेविका यांचे केंद्रस्तर प्रशिक्षण आयोजन करण्यात येणार आहे.
शाळापूर्व तयारी मेळावा क्र. 1 व 2 आयोजन करणेबाबत
शाळापूर्व तयारी मेळावा आयोजन पहिला मेळावा 15 एप्रिल ते 20 एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मेळावा क्र. 2 चे आयोजन जून महिण्यात करण्यात येणार आहे. दोन्ही मेळाव्यादरम्यान 1 ते 8 आठवडे बालकांची शाळापूर्व तयारी पालकांकडून करून घ्यावी. याकरिता शिक्षक, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवक मदत करावी.
शाळापूर्व तयारी अभियानाचा उद्देश
मागील दोन वर्षांपासून कोविडा9 च्या प्रकोपात शाळा बंद असल्याने विद्यार्थी शिक्षणापासून दूर झाला. पूर्व प्राथमिक शिक्षण देणारे अंगणवाडी केंद्रदेखील बंद आहेत. त्यामुळे यावर्षी शाळेत दाखल होणारे बालके व इयत्ता पहिलीत दाखल असलेले बालके यांचे पूर्व प्राथमिक शिक्षण काहीही झाले नाही त्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण सुरु होणेपूर्वी शिक्षणाची आनंददायी पद्धतीने पूर्व तयारी करून घेण्यासाठी हा अभियान मदत करणार आहे.
शाळापूर्व तयारी अभियान स्टॉल
उपक्रमाच्या अनुषंगाने झालेल्या प्रशिक्षणातील मार्गदर्शनानुसार मेळाव्यामध्ये ७ स्टॉल्स लावले जावेत. सर्व स्टॉल्सवर बालकांच्या कृतींच्या नोंदी विकास पत्रावर मेळावा क्रमांकानुसार रकान्यात करण्यात याव्यात. सदर ७ स्टॉल्स पुढीलप्रमाणे : १) नोंदणी (रजिस्ट्रेशन), २) शारीरिक विकास (सूक्ष्म व स्थूल स्नायू विकास), ३) बौद्धिक विकास, ४) सामाजिक आणि भावनात्मक विकास, ५) भाषा विकास, ६) गणनपूर्व तयारी, ७) पालकांना मार्गदर्शन
मेळाव्या संदर्भातील फोटो, व्हिडिओ इ. माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित करीत असतांना #ShalapurvaTayariAbhiyan२०२४, व #शाळापूर्वतयारीअभियान२०२४ या हॅशटॅगचा (#) उपयोग करावा. तसेच मेळाव्यासंदर्भात प्रसारित करण्यात येणाऱ्या पोस्टसाठी SCERT, महाराष्ट्रच्या http://www.facebook.com/Mahascert या फेसबुक पेजला टॅग करण्यात यावे.
शाळापूर्व तयारी अभियान मेळावा आयोजनासाठी PDF
1. शाळा पूर्वतयारी मेळावा Gr
2. मेळावा पायऱ्या
3. मेळाव्यातील घोषवाक्य
4. पालकांसाठी 12 मराठी आयडिया कार्ड
5. मुलांसाठी वर्कशीट बुक
6. मेळावा अभियान बॅनर
7.स्वयंसेवकांना सहभागाचे प्रमाणपत्र
8. अभियान पहिले पाऊल 49 पानांची मार्गदर्शिका
9. शाळा पूर्वतयारी विकास पत्र
शाळा पूर्वतयारी अभियान संपूर्ण माहिती करिता WhatsApp
शाळा पूर्व तयारी अभियान
या अभियानात शाळा स्तरावर इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध क्षमता तपासल्या जाणार आहेत. ज्या क्षमतामध्ये त्यांना मदतीची गरज आहे त्या क्षमतांमध्ये पुढील दोन महिन्यांत आईद्वारे घरीच मार्गदर्शन होऊन वाढ करण्यात येणार आहे. याबाबत पालकांचे समुदेशन करण्यात येणार आहे. यामध्येच पालक, आई, वडील हेच विद्यार्थ्यांचे शिक्षक होणार आहेत. तर शाळांमधील शिक्षक, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवक, माजी विद्यार्थी, केंद्रप्रमुख, तालुका, जिल्हा पर्यवेक्षीय यंत्रणा त्या बालकांकडे वेळोवेळी भेट देणार आहे व मार्गदर्शन करणार आहेत. या पद्धतीने विद्यार्थ्यांची पूर्व तयारी करून पुढील सत्रासाठी त्याला पहिल्या वर्गात दाखल करण्यात येणार आहे.
Shala purv tayari
"Shala purv tayari" is a term that refers to school preparation. There are several videos about "Shala purv tayari" on YouTube, including:
"Shala purv tayari प्रशिक्षण 2023,शाळेतले पहिले पाऊल,shala purv tayari melava"
"Shala purv tayari मेळावा प्रशिक्षण,shala purv tayari melava prashikshan,शाळेतले पहिले पाऊल,zp school"
"Shalapuri pre-school preparation campaign"
"Shala तयारी मेळावा SHALA PURV TAYARI MELAWA 2022 My school"
"Shala purv tayari abhiyan melava"
शाळापूर्व तयारी अभियान | Shala Purv Tayari Abhiyan
शाळा पूर्व तयारी अभियान स्टेप 1 | Shala Purv Tayari Abhiyan
इयत्ता पहिलीत दाखल होणारी मुले व त्यांच्या पालकांची नोंद करणे.
आपल्याला काय करायचे आहे ?
- इयत्ता पहिलीत दाखल होणारी मुले व त्यांच्या पालकांशी संपर्क साधायचा.
- अशा ४-५ पालकांचे मिळून बनविलेल्या या गटांच्या संपर्कात आपल्याला शेवटपर्यंत रहायचे.
- इयत्ता सहावी ते दहावीच्या मुलांना लहान मुलाचे समूह बनविष्यासाठी मार्गदर्शन करायचे.
शाळा पूर्वतयारी अभियान स्टेप 2 | Shala Purv Tayari Abhiyan
शाळा, गाव, वस्ती स्तरावर शाळापूर्व तयारीचा पहिला मेळावा आयोजित करणे.
आपल्याला काय करायचे आहे ?
- प्रत्येक शाळा, गाव, वस्ती स्तरावर मेळाव्याचे आयोजन. पहिल्यांदा मुत्ताचे मूल्यमापन करून रिपोर्ट कार्ड द्यायचे आणि मूल्यमापनाची माहिती स्वत सोबत ठेवायची.
- पालक व मुलाला school readiness pack द्यायचे.
- टॅबलेट अथवा मोबाइलद्वारे व्हिडिओ दाखवून पालकांना ते काय करू शकतात याची माहिती द्यायची.
शाळा पूर्व तयारी अभियान स्टेप 3 | Shala Purv Tayari Abhiyan
पालक व मुले शाळापूर्व तयारीच्या कृती घरी तसेच गटांत करताना.
आपल्याला काय करायचे आहे ?
- जेव्हा पालक घरात व समूहामध्ये आपल्या मुलांच्या शाळापूर्व तयारीसाठी कृती करीत असतील तेव्हा गरजेनुसार पालकांच्या शंकांचे समाधान करायचे आणि त्यांना प्रोत्साहन दयायचे.
- प्रत्येक समूहाला आठवड्यातून एकदा भेटून Idea Card वर आधारित कृती करून घ्यायच्या आहेत. तसेच Idea Card वरील सूचनेनुसार व्हिडिओ दाखवायचे आहेत.
Shala Purv Tayari Abhiyan | शाळापूर्व तयारी अभियान स्टेप 4
दुसरे मूल्यमापन आणि शाळापूर्व तयारी (मेळावा)
आपल्याला काय करायचे आहे ?
- दुसऱ्या मेळाव्याचे आयोजन.
- मुलांची प्रगती पाहून प्रमाणपत्र वितरण.
- गावातील मान्यवर व्यक्तींना बोलावून त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण.
- पालकांचे मनोगत ऐकणे.
- ही शाळापूर्व तयारी एखादया सणाप्रमाणे आनंदाने साजरी करायची आहे.
शाळापूर्व तयारी अभियान आयोजनासाठी PDF
अ.नं. | शाळापूर्व तयारी अभियान आयोजन तपशील | डाउनलोड |
---|---|---|
1 | शाळापूर्व तयारी अभियान - प्रशिक्षण बाबत शासन परिपत्रक | Download |
2 | शाळापूर्व तयारी अभियान - मेळावा आयोजन स्टेप्स | Download |
3 | शाळापूर्व तयारी अभियान - मेळावा BANNER | Download |
4 | शाळापूर्व तयारी अभियान - पोस्टर्स | Download |
5 | शाळापूर्व तयारी अभियान - शाळेतील पहिले पाऊल पुस्तिका | Download |
6 | शाळापूर्व तयारी अभियान - बालकांसाठी वर्कशीट | Download |
7 | शाळापूर्व तयारी अभियान - विकासपत्र (मूल्यमापन शीट) | Download |
8 | शाळापूर्व तयारी अभियान - पालकांसाठी आयडिया कार्ड | Download |
9 | शाळापूर्व तयारी अभियान - स्वयंसेवक सहभागी प्रमाणपत्र | Download |
COMMENTS