विद्याधन शिष्यवृत्ती Vidyadhan Scholarship केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, पुदुचेरी, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, ओडिशा आणि दिल्ली करिता
विद्याधन शिष्यवृत्ती | Vidyadhan Scholarship 2022
विद्याधन शिष्यवृत्ती | Vidyadhan Scholarship |
सरोजिनी दामोदरन फाउंडेशन यांच्या मार्फत दिली जाणारी विद्याधन शिष्यवृत्ती ही संपूर्ण भारतातील उच्च शिक्षण शिष्यवृत्ती आहे. सरोजिनी दामोदरन फाउंडेशनची स्थापना १९९९ मध्ये श्री. एस. डी. शिबुलाल (सहसंस्थापक, इन्फोसिस) आणि श्रीमती कुमारी शिबुलाल (व्यवस्थापकीय विश्वस्त) यांनी केली होती.
आजपर्यंत सरोजिनी दामोदरन फाउंडेशनने केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, पुदुचेरी, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, ओडिशा आणि दिल्ली या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी २७,००० हून अधिक विद्याधन शिष्यवृत्ती वितरित केल्या आहेत. विद्याधन शिष्यवृत्ती कार्यक्रमात सध्या ४७०० हून अधिक विद्यार्थी आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विद्याधन शिष्यवृत्ती अर्ज २०२२ आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबांसाठी आता सुरु करण्यात आले आहेत.
10 वी पास विद्यार्थ्यांसाठी 20 हजार रु. स्कॉलरशिपसाठी अर्ज सुरु- Vidyadhan Scholarship 2022
शिष्यवृत्तीची रक्कम: 11 वी आणि 12वी इयत्तेसाठी शिष्यवृत्तीची रक्कम जास्तीत जास्त रु.10000/ प्रति वर्ष.
विद्याधन शिष्यवृत्ती महत्त्वाच्या तारखा:
■ ३१ ऑगस्ट २०२२: अर्ज करण्याची शेवटची तारीख.
■ 25 सप्टेंबर 2022: स्क्रीनिंग टेस्ट.
■ 1 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2022: या कालावधीत मुलाखत / चाचण्या शेड्यूल केल्या जातील. निवडलेल्या प्रत्येक उमेदवाराला अचूक तारीख आणि स्थान सूचित केले जाईल.
विद्याधन शिष्यवृत्ती करिता पात्रता निकष:
1. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाख रु. पेक्षा कमी.
2. जे विद्यार्थी २०२२ मध्ये १० वीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
3. २०२२ मध्ये १० वीची परीक्षा ८५% किंवा ९ CGPA पेक्षा जास्त गुण (दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ७५% किंवा ७ CGPA).
विद्याधन शिष्यवृत्ती अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रेः
1. विद्यार्थ्याच्या नावे उत्पन्नाचा दाखला (सक्षम अधिकाऱ्याकडून शिधापत्रिका स्वीकारली जात नाही.)
2. 10 वी इयत्तेची गुणपत्रिका ((मूळ मार्कशीट उपलब्ध नसल्यास, तुम्ही SSLC/CBSE/ICSC वेबसाइटवरून तात्पुरती/ऑनलाइन
मार्कशीट अपलोड करू शकता.)
3. पासपोर्ट आकाराचा फोटो.
4. विद्यार्थ्याच्या नावाने ईमेल आयडी.
विद्याधन शिष्यवृत्ती निवड प्रक्रिया :
SDF शैक्षणिक कामगिरी आणि अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे अर्जदारांची शॉर्टलिस्ट करेल. निवडलेल्या उमेदवारांना छोट्या ऑनलाइन चाचणी / मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाईल.
ऑनलाईन अर्ज (Apply Online):
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक - Apply Online
संपर्क:
अधिक माहितीसाठी vidyadhan.maharashtra@sdfoundationindia.com वर ईमेल पाठवा किंवा कुलदीप मेश्राम, फोन: 8390421550/ 9611805868 वर कॉल करा.
टाटा ट्रस्ट शिष्यवृत्ती | Tata Trust Scholarship |
इतर महत्वाच्या शिष्यवृत्ती...
- अल्पसंख्याक प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती | Pre-matric Scholarship Scheme
- बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती
- PM Young Achievers Scholarship Award Scheme for Vibrant India (YASASVI)
- विद्याधन शिष्यवृत्ती करिता अर्ज सुरु | Vidyadhan Scholarship 2022
- टाटा ट्रस्ट शिष्यवृत्ती | Tata Trust Scholarship
- राष्ट्रीय आर्थिकदुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMSS) परीक्षेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची माहिती पोर्टलवर भरणेबाबत.
COMMENTS