राष्ट्रीय आर्थिकदुर्बल घटक शिष्यवृत्ती NMMSS Scholarship परीक्षेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची माहिती पोर्टलवर भरणेबाबत.
राष्ट्रीय आर्थिकदुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMSS) परीक्षेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची माहिती पोर्टलवर भरणेबाबत.
राष्ट्रीय आर्थिकदुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMSS) परीक्षा National Means-cum-Merit Scholarship Scheme |
राष्ट्रीय आर्थिकदुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा मधील Renewal विद्यार्थ्यांची माहिती विद्यार्थी शाळा → जिल्हा→ स्टेट नोडल ऑफिसर→ केंद्रशासन या पध्दतीने www.scholarship.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने भरून व्हेरीफाय करणे आवश्यक आहे. याबाबत पात्र विद्याथ्र्यांच्या याद्या ईमेल व्दारे आपणास पाठविण्यात आलेल्या आहेत. सन २०२१-२२ करीता केंद्रशासनाकडून वेळोवेळी ज्या सूचना प्राप्त होतील ज्या आपणांस वेळोवेळी कळविण्यात येतील. परंतु NSP पोर्टल वर काही जिल्हयांनी त्यांची प्रोफाईल अपडेट केलेली दिसून येत नाही. तरी संबंधित जिल्हयांनी त्यांची प्रोफाईल अपडेट करून व्हेरिफाय करून घ्यावी जेणेकरून शाळांना कडून प्राप्त झालेले प्रस्ताव शिक्षणाधिकारी माध्यमिक स्तरावर पडताळणी करता येतील.
केंद्र शासनाच्या दि. २८/०७/२०२२ परिपत्रकामधील खालील सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे.
- खाजगी विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना अपात्र करणे.
- केंद्रिय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय, तसेच राज्य शासनाकडून वसतिगृहाची सवलतधत असलेल्या शासकीय तसेच खाजगी अनुदानित शाळेतील खाजगी अनुदानित सैनिकी शाळेतील विद्याथ्यांना शिष्यवृत्तीसाठी अपात्र करणे (इ. वो, १० वी. इ. ११ वी व इ. १२ वी साठी लागू).
- इ. ९ वी व इ. ११ वी नुतनीकरणाची माहिती सादर करतांना सर्वसाधारण विद्याथ्र्यांस (जनरल) ५५ टक्के पेक्षा व अनुसूचित जाती / जमातीच्या विद्यार्थ्यास ५० टक्के पेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे.
- इ. १० व नंतर शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांने व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यास त्यास पुढील शिष्यवृत्तीसाठी अपात्र करण्यात यावे.
- इ. १० वी मध्ये सर्वसाधारण (जनरल) विद्यार्थ्यास ६० टक्के पेक्षा व अनुसुचित जाती/जमातीच्या विद्यार्थ्यास ५५ टक्केपेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे.
- पात्र विद्यार्थ्याचे आधारकार्ड काढणे आवश्यक असून आधारक्रमांक बँक खात्याशी सलग्न करावा. त्याशिवाय विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा केली जाणार नाही.
- संचालनालयाने उपलब्ध करून दिलेल्या यादयामधील विद्यार्थ्यांच्या प्रवर्गामध्ये कोणताही बदल करण्यात येऊ नये.
- ऑनलाईन माहिती भरण्याकरीता विद्यार्थी/पालक/मुख्याध्यपक यांचा मोबाईल क्रमांक आवश्यक आहे.
ऑनलाईन माहिती भरण्याकरिता केंद्र शासनाकडून प्राप्त महत्वाच्या सूचना खालीलप्रमाणे आहेत.
- राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्याने ज्या शाळेमधून ज्या जिल्हयामधून उत्तीर्ण केलेली आहे. त्या जिल्हयामधूनच माहिती ऑनलाईन भरणे आवश्यक आहे.
- एखाद्या विद्यार्थ्यांने चूकीची माहिती भरली असल्यास त्यास Defect करावे Reject करू नये. जो विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्रच नाही तरी पण त्याने माहिती भरली असल्यास त्यास Reject करावे.
- Registration Details मध्ये Community / Categary या कॉलम मध्ये विद्यार्थी ज्या प्रवर्गातून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे. तो प्रवर्ग (SC/ST//GENRAL) निवडावा. जे विद्यार्थी (SBC OBC / VINTNT-1, NT-2. NT-3. NT D) या प्रवर्गातून शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेले आहे त्यांनी जनरल हा प्रवर्ग निवडून माहिती भरावी.
- Admission Fees, Tution Fees, Mise Fees यामध्ये टाकण्यात यावा, यामध्ये कोणताही बदल करण्यात येऊनये.
- Basic Details मधील Marital Status मध्ये Unmarried निवडावे Parents Profession मध्ये Other हा पर्याय निवडावा.
- Previous Board/University Name # Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary. Pune निवडावे.
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या बँक खात्याचा तपशील (IFSC CODE, BANK ACCOUNT NUMBER ETC) योग्य टाकण्यात यावा.
सदर पोर्टल हे ऑनलाईन व कालमर्यादित असल्यामुळे आपल्या कार्यालयाच्या अंतर्गत येणान्या प्रत्येक शाळेने पात्र विद्यार्थ्यांची अचूक माहीती पोर्टलवर विहीत मुदतीत भरणे बंधनकारक आहे. सदर विद्याथ्यांची माहिती भरण्यास विलंब व कोणतीही टाळाटाळ झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शाळेची व आपल्या कार्यालयाची राहील.
शिक्षणाधिकारी कार्यालयाने त्यांच्या अधिपत्याखालील सर्व शाळांचे प्रोफाईल अदयावत करणे/ तपासणे, शिष्यवृत्तीधारक कोणताही विद्यार्थी हा ऑनलाईन माहिती न भरल्यामुळे शिष्यवृत्ती पासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील, याची नोंद घ्यावी.
असे परिपत्रक (महेश पालकर) शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालक शिक्षण संचालनालय, म.रा. पुणे-१ यांचे कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आलेले आहे.
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची माहिती भरणेकरिता पोर्टल- www.scholarship.gov.in
परिपत्रक , शिक्षण संचालक- Downlaod pdf
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा
इतर महत्वाच्या शिष्यवृत्ती...
- अल्पसंख्याक प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती | Pre-matric Scholarship Scheme
- बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती
- PM Young Achievers Scholarship Award Scheme for Vibrant India (YASASVI)
- विद्याधन शिष्यवृत्ती करिता अर्ज सुरु | Vidyadhan Scholarship 2022
- टाटा ट्रस्ट शिष्यवृत्ती | Tata Trust Scholarship
- राष्ट्रीय आर्थिकदुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMSS) परीक्षेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची माहिती पोर्टलवर भरणेबाबत.
COMMENTS