शालेय आरोग्य कार्यक्रम (School Health Programme) प्रशिक्षणासाठी शाळा व प्रशिक्षणार्थी मुख्याध्यापक व शिक्षक यांची लिंकद्वारे नोंदणी करणेबाबत.
School Health & Wellness Programme | शालेय आरोग्य कार्यक्रम प्रशिक्षण
School Health & Wellness Programme Registration शालेय आरोग्य कार्यक्रम प्रशिक्षण नोंदणी |
अत्यंत महत्त्वाचे/काल मर्यादित/प्रथम प्राधान्याने...
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ,
जि.ठाणे, जालना, पालघर, नाशिक, यवतमाळ, हिंगोली, अहमदनगर
शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक)
विषय - आयुष्मान भारत अंतर्गत शालेय आरोग्य कार्यक्रम प्रशिक्षण( School Health Programme) प्रशिक्षणासाठी नोंदणी न केलेल्या शाळा , प्रशिक्षणार्थी मुख्याध्यापक व शिक्षक यांनी लिंक द्वारे पोर्टलवर नोंदणी करणेबाबत...
उपरोक्त संदर्भिय विषयानुसार दिनांक 23 मार्च 2022 ते 26 मार्च 2022 यादरम्यान ठाणे, जालना, पालघर, नाशिक, यवतमाळ, हिंगोली, अहमदनगर या सात जिल्ह्यांमध्ये शालेय आरोग्य कार्यक्रमाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणासाठी जवळपास 85 टक्के शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी पोर्टलवर नोंदणी केली होती.माञ अद्यापही काहीं शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांची नोंदणी होणे बाकी आहे.त्यामुळे नोंदणी न केलेल्या सर्व शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी तात्काळ पोर्टल वर नोंदणी करावी.कारण लवकरच अनुपस्थित प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी दुसऱ्या टप्प्यात सदर प्रशिक्षण आयोजित केलें जाणार आहे.हे प्रशिक्षण उपरोक्त 7 जिल्हयातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक यांनी घेणे अनिवार्य आहे...
नोंदणी करण्याची अंतिम मुदत 7 ऑगस्ट 2022 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहील... प्राचार्य व डाएट Shp नोडल अधिकारी यांनी जिल्हयातील शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक यांच्या सहकार्याने 100 टक्के नोंदणी करणे अपेक्षित आहे.... जिल्हयातील शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक यांनी या संदर्भात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना उचित सहकार्य करावे....
टीप-
उपरोक्त 7 जिल्हयातील इयत्ता 6 वी ते 12 वी पर्यंतच्या सर्व शासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था/ शासकीय अनुदानित प्रकारच्या प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक, एक पुरुष शिक्षक, एक महिला शिक्षिका(ज्या शाळेत महिला शिक्षिका नसतील तेथील दोन पुरुष शिक्षक) अशा पोर्टल वर अद्याप नोंदणी न केलेल्या एकूण 3 व्यक्तींनी आरोग्यवर्धिनी दूत म्हणून पोर्टल वर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे.
नोंदणी करण्यासाठी लिंक: https://shp.scertmaha.ac.in
जिल्हानिहाय/तालुकानिहाय नोंदणीची सद्यस्थिती पुढील लिंकद्वारे पाहता येईल... https://shp.scertmaha.ac.in/admin/DistrictList.aspx
School Health & Wellness Programme
भारत सरकारने ‘आयुषमान भारत’ योजनेंतर्गत संपूर्ण देशात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि केंद्रीय शालेय शिक्षण मंत्रालय यांचे मार्फत ‘शालेय आरोग्य कार्यक्रम’ (School Health & Wellness Programme) सुरु केला आहे. शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शासकीय अनुदानित इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळांमध्ये सदर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक सवयी, जाणीवा या विषयी जनजागृती व जबाबदारी निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
आपल्या राज्यामध्ये आयुषमान भारत उपक्रमांतर्गत SCHOOL HEALTH AND WELLNESS कार्यक्रम यवतमाळ, पालघर, अहमदनगर, ठाणे, नाशिक, जालना व हिंगोली या जिल्ह्यातील इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व शासकीय अनुदानित शाळांमध्ये राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग आणि शालेय शिक्षण विभाग यांच्या समन्वयाने राबविण्यात येणार आहे.
उपरोक्त जिल्ह्यातील इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व शासकीय अनुदानित प्रकारच्या प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक, एक पुरुष शिक्षक व एक महिला शिक्षक असे एकूण तीन व्यक्तींना आरोग्यवर्धिनी दूत SCHOOL HEALTH AND WELLNESS AMBASSADOR म्हणून online प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
सदर प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेल्या प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक व दोन शिक्षक यांनी प्रस्तुत पोर्टल वरील मेनू pre-test, training session, schedule यावर शाळा UDISE क्रमांकाद्वारे लॉगीन करून वेळापत्रकाप्रमाणे उपस्थित रहायचे आहे. प्रशिक्षणार्थींनी सोबतच्या मार्गदर्शक सूचनांचे अवलोकन करून पालन करावे.
अत्यंत महत्त्वाचे/काल मर्यादित/प्रथम प्राधान्याने...
सर्व शिक्षक/शिक्षिका (Shp चे प्रशिक्षण घेतलेले)
जि.ठाणे, जालना, पालघर, नाशिक, यवतमाळ, हिंगोली, अहमदनगर,नंदुरबार उस्मानाबाद ,वाशिम, गडचिरोली, औरंगाबाद, नांदेड, जळगाव, धुळे, बीड
विषय :- शालेय आरोग्य कार्यक्रम अंतर्गत MIS DASH BOARD भरणे संदर्भात आयोजित व्हिडिओ Conference साठी Shp चे प्रशिक्षण झालेल्या मुख्याध्यापक व शिक्षक यांनी उपस्थित राहणेंबाबत....
संदर्भ :- केंद्र शासनाचा दि २६/०७/२०२२ रोजीचा ई मेल
उपरोक्त संदर्भीय विषयानुसार शालेय आरोग्य कार्यक्रम अंतर्गत सन 2020- 21 मध्ये उपरोक्त ९ जिल्ह्यातील आरोग्य वर्धिनी दूत यांचे तसेच सन 2021- 22 मध्ये उपरोक्त 7 जिल्हातील आरोग्य वर्धिनी दूत यांचे केन्द्रशासना मार्फत online प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमांतर्गत शाळेमध्ये शिक्षकांकडून ११ थीम वर घेतल्या जाणाऱ्या सत्रांचा अहवाल भरण्याकरिता MIS DASH BOARD तयार करण्यात आले आहे. तरी सदर MIS DASH BOARD चे Orientation दि ०४/०८/२०२२ रोजी Video Conference द्वारे घेण्यात येणार आहे. तरी सदर Video Conference करिता 16 जिल्हातील आरोग्यवर्धिनी दूत यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे.जेणेकरून शालेय आरोग्य कार्यक्रमाच्या कामाचा अहवाल MIS DASH BOARD वर भरणे शक्य होईल.
शालेय आरोग्य कार्यक्रमाचे यापूर्वी दोन्हीं टप्प्यात प्रशिक्षण घेतलेल्या शाळेतील मुख्याध्यापक, प्रशिक्षण घेतलेले शाळेतील शिक्षक व शिक्षिका तसेच डाएट नोडल अधिकारी व सर्व क्षेत्रीय अधिकारी यांनी सदर व्हिडिओ कॉन्फरन्स साठी उपस्थित राहणे अनिवार्य आहे...
Video Conference Date : - 4/8/2022
Video Conference वेळ : - 12.30 pm- 2.30 pm
Video Conference लिंक : - https://jhpiego.zoom.us/j/94204586104
COMMENTS