पाठटाचण बंद. शिक्षकांना पाठटाचन काढण्यासाठी सक्ती न करणेबाबत सर्व परिपत्रके शिक्षकांचे पाठटाचण काढण्याची सक्ती नाही.
दैनिक पाठ टाचण काढण्याची सक्ती न करणे बाबत शासन निर्णय, MSCERT चे परिपत्रक व शिक्षणाधिकारी यांची पत्र. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद चे सहसंचालक यांनी दिनांक 5 सप्टेंबर 2019 रोजी राज्यातील खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांना पाठ टाचण काढण्याची सक्ती न करण्याबाबत पुढील प्रमाणे परिपत्रक निर्गमित केले आहे.
सदर परिपत्रकामध्ये शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक सर्व यांना आपल्या अधिनिस्त सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा मधील मुख्याध्यापक यांना अवगत करावे असे निर्देश देखील दिलेले आहेत.
शिक्षकांचे पाठ टाचण आता पूर्णपणे बंद ?
शिक्षक पाठटाचण बाबत नवीन परिपत्रक |
Teachers are not forced to Pathtachan | lesson plan
राज्यातील शिक्षकांना रोज काढावे लागणारे दैनिक पाठ टाचण आता बंद करण्यात आले आहे. याबाबत विद्या प्राधिकरणाने दि. 15 सप्टेंबर 2019 रोजी तसे आदेश काढले आहेत परंतु...
शाळेतील प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीने शिकत असतो व त्यापद्धतीने शिक्षकांना अध्यापन करावे लागत असून त्यासाठी पारंपरिक पद्धतीने काढावे लागणारे दैनिक, मासिक व वार्षिक नियोजनाचे टाचण निरर्थक ठरत आहे. शालेय शिक्षण विभागाने त्या संदर्भात दि. 22 जून 2015 रोजी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमाचा शासन निर्णय निर्गमित केला त्यामध्ये अशा प्रकारच्या पाठ टाचणासारख्या कागदपत्रांची शिक्षकांकडून मागणी करण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तरीदेखील आपल्या राज्यातील अनेक शाळा व अधिकाऱ्यांकडून पाठ टाचण वहीची सक्ती करण्यात येत होती. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र शासन निर्णयाच्या १३.१ मुद्द्यांचा आधार घेत वस्तुस्थिती समजावून. अवर सचिवांनीही तातडीने सकारात्मक प्रतिसाद देत आदेश काढून राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश देत पाठ टाचणची सक्ती नकरण्याचे आदेश काढले. शिक्षकांचे पाठटाचण काढण्याची सक्ती नाही. shikshakana-paath-taachan-sakti-n-karane-paripatrak
- दि. 22 जून 2015 रोजी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमाचा शासन निर्णय
- विद्या प्राधिकरणाने दि. 15-09-2019 रोजीचा आदेश
- शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद, जळगाव यांचे परिपत्रक24-08-2022
- शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद, चंद्रपूर यांचे परिपत्रक25-08-2022
- शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद, वर्धा यांचे परिपत्रक 30-08-2022
- शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद, जालना यांचे परिपत्रक 07-07-2023
शिक्षक पाठ टाचण बाबत सर्व नवीन परिपत्रक | Teachers are not forced to Pathtachan 👉 Downloas all pdf files
मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षकांना तासिका घेणे बंधनकारक! 👉 Downloas all pdf files
Maharashtra State Educational WhatsApp Group
- Telegram - School Edutech Telegram
- Google News School Edutech Google News
- Telegram - School Edutech Telegram
- Google News School Edutech Google News
www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
सदर पाठटाचण सक्ती न करण्याचे आदेश महाराष्ट्रातील सी. बी. एस. ई. शाळांना लागू आहेत का? असल्यास कळवावे.
उत्तर द्याहटवा