संरक्षणशास्त्र अंतर्गत मूल्यमापन इयत्ता 9 वी व 10 वी | Defense Studies Internal Assessment संरक्षण शास्त्र PDF लेखी काम प्रात्यक्षिक उत्तरे
विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता दहावीच्या वर्गात तुम्हां सर्वांचे स्वागत आहे. 'संरक्षणशास्त्र' या विषयाची कार्यपुस्तिका तुमच्या हाती देताना आम्हांला विशेष आनंद होत आहे. या पुस्तिकेत ‘राष्ट्रीय सुरक्षा' या संकल्पनेच्या बदलत्या स्वरूपाबरोबरच अंतर्गत सुरक्षा तसेच आपत्ती व्यवस्थापन व आपत्ती व्यवस्थापनातील लष्कराचे कार्य यांविषयीची संक्षिप्त माहिती दिलेली आहे. Defense Science Internal Assessment Class 9th and 10th Studies Defense Studies Internal Assessment Class 9th and 10th संरक्षणशास्त्र-अंतर्गत-मूल्यमापन-Defense-Studies-Internal-Assessment
शालेय श्रेणी वैकल्पिक विषय संरक्षणशास्त्र मूल्यमापन योजना
२१ व्या शतकात आवश्यक असलेली संरक्षणशास्त्रविषयक माहिती आत्मसात करण्यासाठी व संरक्षणशास्त्र क्षेत्रातील करिअरच्या यशस्वी वाटचालीसाठी या विषयातून आवश्यक ते मार्गदर्शन तुम्हांला मिळेल, असा विश्वास वाटतो. तुम्हांला माहीतच आहे, की संरक्षणशास्त्र याविषयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. संरक्षणशास्त्र या कार्यपुस्तिकेचा मूळ हेतू तुमच्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा, राष्ट्रहित, देशप्रेम या मूल्यांची जोपासना व्हावी हा आहे. चर्चा, क्षेत्रभेटी, मुलाखती अशा अनेक कृतींतून तुम्ही हा विषय अभ्यासणार आहात. हे सर्व उपक्रम तुम्ही आवर्जून करा. या उपक्रमांतून तुमच्या विचारप्रक्रियेला चालना मिळेल. चर्चेतून मिळालेले मुद्दे व माहिती लिहिण्यासाठी या पुस्तिकेत पुरेशी जागा दिलेली आहे. तसेच आवश्यक तेथे तुमच्या शिक्षकांची, पालकांची व वर्गातील सहकाऱ्यांची मदत घ्या. आजच्या तंत्रज्ञानाच्या वेगवान युगात संगणक, स्मार्टफोन हे तर तुमच्या परिचयाचे आहेतच. कार्यपुस्तिकेतून अभ्यास करताना माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या साधनांचा सुयोग्य वापर करा, जेणेकरून तुमचे अध्ययन सुकर होईल. कार्यपुस्तिका वाचताना, अभ्यासताना आणि समजून घेताना तुम्हांला त्यातील आवडलेला भाग तसेच अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी, पडणारे प्रश्न आम्हांला जरूर कळवा. तुम्हांला तुमच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हार्दिक शुभेच्छा !
संरक्षणशास्त्र मूल्यमापन योजना | Defense Studies Internal Assessment
संरक्षणशास्त्र | Defense Studies या विषयाचे मूल्यमापन करताना पुढील बाबी लक्षात घ्याव्यात
- या विषयासाठी लेखी परीक्षा नाही.
- संरक्षणशास्त्र कार्यपुस्तिकेत दिलेल्या लेखी कामासाठी ४०% भारांश आणि कृती / प्रात्यक्षिक चर्चा, क्षेत्रभेट, भूमिकाभिनय, संग्रह यासाठी ६०% भारांश ठेवण्यात आला आहे.
- स्थानिक उपलब्ध परिस्थितीनुसार निर्धारित उपक्रमासोबत इतर उपक्रमाचेही आयोजन करण्यास हरकत नाही. तथापि निर्धारित उपक्रम घेणे आवश्यक आहे.
(A) लेखीकामावर आधारित उपक्रम
(B) कृती कार्यावर आधारित उपक्रम (उदा. चर्चा, क्षेत्रभेट, मुलाखती, अभिनयाद्वारे
विविध भूमिकांचे सादरीकरण भूमिकाभिनय, इंटरनेटचा वापर, चित्रे, कात्रणे यांचा संग्रह.
नकाशावाचन, आराखडा तयार करणे इत्यादी.)
(अ) लेखीकामावर आधारित उपक्रम (उदा.. .. तुमच्या शब्दांत लिहा.)
(१) उपक्रमाची मांडणी
(२) घटक निहाय आलेले मुद्दे
(३) वापरलेले संदर्भ साहित्य, पुस्तके, इंटरनेट इत्यादी.
(४) मुद्दयांची क्रमबद्ध मांडणी
(५) स्वतःचे मत, विचार, स्पष्टता
(६) लेखनाची सुरुवात, मध्य, शेवट, लेखनाची शैली, तांत्रिक बाबी या निकषाचा विचार करावा.
(ब)कृतीकार्य - क्षेत्रभेट, भूमिकाभिनय, मुलाखती, आराखडा तयार करणे, नकाशावाचन, कात्रणे
इत्यादी. साठी
(१) कृतीत स्वत:हून सहभाग घेणे.
(२) कृतीतील सहजता, सातत्य, उत्स्फूर्तपणा इत्यादी.
(३) कृतीचा मुद्देसूद अहवाल लिहिणे.
(४) क्षेत्रभेट – संबंधित व्यक्ती, संस्था यांची मान्यता, भेटीचे नियोजन, भेटीनंतर संबंधितांना
आभार पत्र पाठवणे इत्यादी.
(५) मुलाखतीसाठी पूर्व तयारी, प्रत्यक्ष मुलाखत, आभार इत्यादी निकषांचा विचार करावा.
(क) संकलित मूल्यमापन - प्रथम व व्दितीय सत्रातील मूल्यमापन स्वतंत्रपणे करावे व त्यानुसार वर्षाअखेरीस दिलेल्या सारणीनुसार संकलित गुणपत्रक तयार करावे. -
विषयानुसार तोंडी, प्रात्यक्षिक, परीक्षा अंतर्गत मूल्यमापन नोंदी (रेकॉर्ड)
विषय संपूर्ण अंतर्गत मूल्यमापन नोंदी भाषा (मराठी, हिंदी, इंग्रजी) तोंडी परीक्षा गुणदान नोंदी गणित गृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी MCQ विज्ञान व तंत्रज्ञान प्रात्यक्षिक परीक्षा, उपक्रम सामाजिक शास्रे गृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी MCQ आरोग्य व शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमावर आधारीत लेखन कार्य व प्रात्यक्षिक परीक्षा जलसुरक्षा उपक्रम, प्रकल्प, लेखी, तोंडी संरक्षण शास्र उपक्रम, प्रकल्प, लेखी, तोंडी सुधारित मूल्यमापन परिपत्रक व शासन निर्णय pdf
विषय | संपूर्ण अंतर्गत मूल्यमापन नोंदी |
---|---|
भाषा (मराठी, हिंदी, इंग्रजी) | तोंडी परीक्षा गुणदान नोंदी |
गणित | गृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी MCQ |
विज्ञान व तंत्रज्ञान | प्रात्यक्षिक परीक्षा, उपक्रम |
सामाजिक शास्रे | गृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी MCQ |
आरोग्य व शारीरिक शिक्षण | अभ्यासक्रमावर आधारीत लेखन कार्य व प्रात्यक्षिक परीक्षा |
जलसुरक्षा | उपक्रम, प्रकल्प, लेखी, तोंडी |
संरक्षण शास्र | उपक्रम, प्रकल्प, लेखी, तोंडी |
सुधारित मूल्यमापन | परिपत्रक व शासन निर्णय pdf |
10 वी भाषा विषय तोंडी परीक्षा प्रश्नपत्रिका अंतर्गत मूल्यमापन |
हे हि वाचा...
इयत्ता 10 वी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा विषय तोंडी परीक्षा नमुना प्रश्नपत्रिका / अंतर्गत मूल्यमापन 👉 Downlaod All pdf files
10 वी गणित अंतर्गत मूल्यमापन, गृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी MCQ 👉 Downlaod All pdf files
इयत्ता १० वी / 9 वी विज्ञान आणि तंत्रज्ञान अंतर्गत मूल्यमापन, प्रकल्प, उपक्रम, प्रात्यक्षिक- प्रयोगवही, गृहपाठ | 10th Science Internal Evaluation, Project, Practical Book, Home work 👉 Downlaod All pdf files
इयत्ता 10 वी सामाजिक शास्रे अंतर्गत मूल्यमापन 👉 Downlaod All pdf files
आरोग्य व शारीरिक शिक्षण अंतर्गत मूल्यमापन | Internal Evaluation of Health and Physical Education 👉 Downlaod All pdf files
इयत्ता 9 वी व 10 वी - जलसुरक्षा विषयाचे अंतर्गत मूल्यमापन | Internal Evaluation of Water Security subject 9th and 10th 👉 Downlaod All pdf files
इयत्ता 9 वी व 10 वी - संरक्षणशास्त्र अंतर्गत मूल्यमापन | Defense Studies Internal Assessment Class 9th and 10th 👉 Downlaod All pdf files

COMMENTS