जानेवारी 2023 मध्ये, DA मध्ये 4 टक्के वाढ होईल, त्यानंतर कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता DA मिळेल.
DA Hike Latest Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central employees) केंद्र सरकारकडून (Central Goverment) कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात (DA) वाढ केली.
7th pay commission: कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर!
AICPI निर्देशांकाच्या मागील महिन्यात घेतलेल्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होत आहे की त्यांच्या महागाई भत्त्यात (DA) चार टक्के (4%) वाढ जाहीर केली आहे. पगारात तुम्हाला वाढीव लाभ नक्की मिळू शकतो.
महागाई भत्त्यात (DA) थकबाकीही मिळेल परिपत्रक
शासन निर्णय-
राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.
२. शासन असे आदेश देत आहे की, दिनांक १ जानेवारी, २०२३ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ३८ % वरुन ४२% करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जानेवारी, २०२३ ते दिनांक ३१ मे २०२३ या कालावधीतील थकबाकीसह माहे जून, २०२३ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी.
३. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील.
४. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. अनुदानप्राप्त संस्था च जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३०६३०१८३२१४२२०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
नवीन 42% डीए मिळेल
कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA)अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकावर अवलंबून असतो. त्या बदलानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात महागाई भत्त्यानुसार वाढ होते. यावर्षी, जानेवारी 2023 मध्ये, DA मध्ये 4 टक्के वाढ होईल, त्यानंतर कर्मचाऱ्यांना ४२ टक्के दराने महागाई भत्ता DA मिळेल.
7 व्या वेतन आयोगानुसार वेतनात किती वाढ होणार?
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38 टक्के महागाई भत्त्यानुसार वेतन मिळत आहे. सरकारने त्यात 4 टक्के वाढ केल्यास ती ४२ टक्के होईल. अशा परिस्थितीत, जर तुमचे किमान मूळ वेतन 18,000 रुपये असल्यास, तर तुमचा एकूण DA 6,840 रुपये असेल आणि एकूण फायदा 720 रुपये प्रति महिना मिळेल. त्याच वेळी, मूळ वेतनावर कमाल 54,000 रुपये, DA म्हणून 56,000 रुपये 27,312 रुपये मिळतील. यामध्ये तुम्हाला दरमहा एकूण 2,276 रुपयांचा फायदा मिळेल.
salary-da-calculator-४२-takke-mahagaibhatta-wadh
महागाई भत्ता ४२% – पगार किती वाढेल हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा
42 टक्के महागाई भत्त्यानुसार जानेवारी 2023 ते जून 23 पर्यंतचा महागाई भत्ता फरक Calculator
42 % DA Calculater with Diffrance
COMMENTS