डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा | Dr. Babasaheb Ambedkar GK Quiz डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची थोडक्यात संपूर्ण माहिती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा | Dr. Babasaheb Ambedkar General Knowledge Quiz | Dr.Babasaheb ambedkar general knowledge डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जनरल नॉलेज वरील प्रश्न याठिकाणी पाहणार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील सामान्य ज्ञान प्रश्नामधील हे सर्वात जास्ती महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत. Dr. Babasaheb Ambedkar Jayanti General Knowledge Competition
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा Dr. Babasaheb Ambedkar GK Quiz |
Dr. Babasaheb Amedkar Jayanti GK QUIZ (डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा)
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा | Dr. Babasaheb Ambedkar General Knowledge Quiz प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा मध्ये स्वागत. 14 एप्रिल या मंगल दिनी महामानव, भारतरत्न , भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त इतिहास समजून घेऊया व इतरांना पाठवूया...
प्रश्नमंजुषा | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा Quiz competition on Dr. Babasaheb Ambedkar birth anniversary भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या संकेतस्थळावर आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेत भाग घेऊन आपले ज्ञान वाढवा.
भीमराव रामजी आंबेडकर तथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कायदेतज्ज्ञ, घटनाकार, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक क्रांतीच्या चळवळीला प्रेरणा दिली आणि महिलांच्या व कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे स्वांतत्र्यपूर्व भारताचे मजूरमंत्री स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री तसेच भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानाच्या विविध शाखामध्ये त्यांचे योगदान अतुलनीय आहे.
GK सामान्य ज्ञान प्रश्न आणि उत्तरे : डॉ भीमराव आंबेडकर
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीमागील प्रमुख आधारस्तंभ आहेत. अनेक सर्वेक्षणांतून त्यांना जगातील सर्वात हुशार व्यक्ती म्हणून घोषित करण्यात आले आहे. या लेखात डॉ. आंबेडकर यांच्या चरित्रावर आधारित GK सामान्य ज्ञान प्रश्न आणि उत्तरे सोडवू.
ऑक्सफर्ड विद्यापीठाने केलेल्या “द मेकर्स ऑफ द युनिव्हर्स” या जागतिक सर्वेक्षणाच्या आधारे महामानव, भारतरत्न , भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गेल्या 10,000 वर्षांतील सर्वोच्च 100 मानवतावादी जागतिक व्यक्तिमत्त्वांच्या यादीत चौथ्या स्थानावर ठेवण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा | Dr. Babasaheb Ambedkar General Knowledge Quiz मध्ये डॉ. आंबेडकर यांच्या चरित्रावर आधारित GK सामान्य ज्ञान प्रश्न आणि उत्तरे देण्यात आलेले आहेत
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची थोडक्यात संपूर्ण माहिती | Dr.Babasaheb Ambedkar Yanchi Mahiti
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण
डॉ. बाबासाहेबांचे वडील रामजी सपकाळ यांनी पुण्यात आपले शिक्षण पूर्ण केले. पंतोजी शाळेमध्ये ते होते. त्यांनी आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लष्करामध्ये शिक्षक म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली. नंतर शाळेत ते प्रधान शिक्षक झाले. त्यानंतर त्यांना मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती मिळाली. 14 वर्षे मुख्याध्यापकांचे काम सांभाळल्याने त्यांना सैन्यात मेजर (सुभेदार) म्हणून बढती मिळाली. नंतर ते महू येथे नोकरी निमित्त वास्तव्यास होते. कारण महूला मिलिटरी हेडकॉर्टर्स ऑफ वॉर म्हणून ओळखले जाई. तेथेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये झाला. भिमाबाई यांच्या पोटी जन्म घेणारे डॉ. बाबासाहेब हे 14 वे अपत्य होते. भिमाबाई यांचे पुढे बाबासाहेबांच्या बालपणीच निधन झाले. (भिमाबाई यांची समाधी सातारा येथे आहे.) बाबासाहेबांचे नाव 'भीम' असे ठेवण्यात आले.
नंतर 'भीम' यांचे भीमराव त्यांचे पूर्ण नाव डॉ.भीमराव रामजी आंबेडकर आणि यांना नंतर लोक आपले बाबा संबोधू लागले आणि नंतर ते सर्वांचे 'बाबासाहेब' झाले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव - डॉ.भीमराव रामजी आंबेडकर आहे. या भिमाचा सांभाळ डॉ. आंबेडकरांची आत्या मीराबाईंनी केला. हा भीम बुद्धिवान व्हावा, त्याने दीनदलित समाजाचा उद्धार करावा. अशी पिता रामजी सुभेदार यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी लहानपणीच बाळ 'भीम' यांच्यावर पाच मुल्यसंस्कार रुजवले होते.
- शिक्षण
- शिस्त
- स्वावलंबन
- स्वाभिमान
- कठोर परिश्रम.
या मूल्यांचा बाबासाहेबांनी आपल्या जीवनात अंगीकार केला आणि त्यानुसार वाटचाल सुरु केली आणि त्यानंतर पुढे हा 'भिम' या आपल्या भारत देशातील दीनदलितांचा उद्धारकर्ता, भारतीय राज्यघटनेचे निर्माते ठरले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळ 'महु' ला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. महू याठिकाणी लाखो पर्यटक प्रत्येक वर्षी भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळाला वंदन करीत असतात. महू या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जन्मस्थळावर शासनाने यथोचित स्मारक उभे केले आहे. हे स्मारक एक चैतन्याचा झरा आहे. (महू हे ठिकाण मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ या ठिकाणाहून 2 ते 3 तासाच्या अंतरावर व इंदौर येथून साधारण 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे.)
महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील 'आंबडवे' वे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव. खूप कमी लोकसंख्येचे , डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्वजांचे आंबडवे गाव. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबेडकर आडनावाची कहाणी खूप रंजक आहे. 'आंबडवे' गावात सपकाळ कुटुंबीय राहत होते. बाबासाहेबांचे आडनाव सपकाळ. नंतर त्यांच्या वडिलांनी बाबासाहेबांचे आडनाव सातारा येथील प्रतापसिंह शाळेत आंबाडवेकर असे 7 नोव्हेंबर 1900 रोजी नोंदविले.
आजही 7 नोव्हेंबर हा शाळा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 'शाळा प्रवेश दिन' म्हणून मोठ्या आनंदात साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव नोंदवलेले रजिस्टर आणि त्यांची स्वाक्षरी पहावयास या शाळेमध्ये मिळते. बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण सातारा येथेच गेले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी मुंबईत स्थलांतर केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर 1907 मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले व त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कॉलेजचे शिक्षण मुंबईच्या 'एल्फिस्टन' याठिकाणी झाले, तिथे 1912 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले.
बाबासाहेबांचे परदेशातील शिक्षण हे बडोद्याच्या प्रसिद्ध सयाजीराव महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य केले. 1913 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे श्रेष्ठ ज्ञानयोगी होते. ते प्रकांड पंडित होते त्यांची विद्वत्ता अद्वितीय अशी होती. मात्र यासाठी त्यांनी अपार कष्ट केले. परदेशात जाऊन अत्यंत कठीण परिस्थितीत डॉक्टर बाबासाहेबांनी उच्च शिक्षण घेतले.
परदेशातील शिक्षणासाठी त्यांनी जे कष्ट घेतले त्याला तोड नाही. दररोज अठरा-अठरा तास याप्रमाणे काही महिने त्यांनी सलग सतत अभ्यास केला. शिक्षणामुळेच प्रगतीच्या आणि विकासाच्या विविध संधी प्राप्त होतात. हे त्यांनी आपल्या उदाहरणावरून सिद्ध केले. या ज्ञानयोग्याने विविध विषयांचे ज्ञान मिळण्यासाठी जे अथक परिश्रम घेतले ते सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात त्यांनी अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र इत्यादी विषयांचे अध्ययन केले. 1915 मध्ये त्यांनी 'प्राचीन भारतातील व्यापार' या विषयावर प्रबंध लिहून कोलंबिया विद्यापीठाची एम.ए. ची पदवी संपादन केली. त्यांच्या 'नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया: ए हिस्टॉरिकल ऍनालीटिकल स्टडी' या प्रबधाबद्दल कोलंबिया विद्यापीठाने त्यांना पीएच.डी. ही पदवी प्रदान केली.
सामाजिक स्वातंत्र्याशिवाय राजकीय स्वातंत्र्याला अर्थ नाही. असा ठाम विश्वास डॉ. आंबेडकरांचा होता. वहिष्कृत समाजातील शूद्रांना जर आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य मिळाले नाही तर राजकीय स्वातंत्र काय कामाचे! ते एक मृगजळच. भारताचे राजकीय अस्तित्व अचेतन नसून ते सचेतन भावनिक राष्ट्र आहे. असे सांगणारे महामानव बोधिसत्व डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 या दिवशी झाला.14 एप्रिल हा त्यांचा जन्म डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती म्हणून साजरा केला जातो.
GK सामान्य ज्ञान प्रश्न आणि उत्तरे: डॉ भीमराव आंबेडकर
- डॉ.आंबेडकरांचा जन्म कोणत्या राज्यात झाला? ,
- डॉ आंबेडकर यांचा जन्म कधी झाला? ,
- डॉ.आंबेडकरांच्या वडिलांचे नाव काय होते? ,
- डॉ. आंबेडकरांबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? ,
- डॉ.आंबेडकरांना भारतरत्न कधी देण्यात आला?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा | Dr. Babasaheb Ambedkar GK Quiz
Enter Your Name & Roll No
Generated By School Edutech
Name : Apu
Roll : 9
Total Questions:
Correct: | Wrong:
Attempt: | Percentage:
[1] डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला?
14 एप्रिल 1891
6 डिसेंबर1956
6 डिसेंबर 1891
14 एप्रिल 1956
[2] डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय होते ?
बाबासाहेब आंबेडकर
भीमराव रामजी आंबेडकर
भीमराव आंबेडकर
डॉक्टर आंबेडकर
[3] डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला ?
अमरावती
मुंबई
महू
नागपूर
[4] डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा कोणत्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठात स्थापित केलेली आहे?
कोलंबिया
केंब्रिज
मॅसाच्युसेट्स
यापैकी नाही
[5] बाबासाहेब आंबेडकरांना भारतातील कोणता सर्वोच्च पुरस्कार देण्यात आलेला आहे ?
दादासाहेब फाळके
ज्ञानपीठ पुरस्कार
भारतरत्न
फिल्मफेअर
[6] बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली होती ?
काँग्रेस
बहुजन समाज पक्ष
स्वतंत्र मजूर पक्ष
समाजवादी पक्ष
[7] डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे स्वतंत्र भारतात कुठले मंत्रिपद होते
कामगार मंत्री
कायदा आणि न्याय मंत्री
अर्थ मंत्री
प्रधान मंत्री
[8] डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली हे स्थळ कोणते ?
नाशिक
महाड
नागपूर
पुणे
[9] डॉ.आंबेडकरांनी चवदार तळे सत्याग्रह कोठे केला?
कोल्हापूर
मुंबई
महाड
ठाणे
[10] 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी......... या ग्रंथाचे दहन केले.
बायबल
मनुस्मृती
3महाभारत
रामायण
[11] डॉक्टर आंबेडकरांनी दिलेला संदेश कोणता?
तरुणांनो जागे व्हा...
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा
चला जागे व्हा व ध्येय प्राप्ती करा..
यापैकी नाही.
[12] भारतीय राज्यघटना निर्मितीमध्ये डॉ.आंबेडकरांनी भूषविलेले पद..
घटना समितीचे अध्यक्ष
घटना मसुदा समितीचे अध्यक्ष
घटना समितीचे सल्लागार
मार्गदर्शक
[13] खालीलपैकी कोणता विचार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा आहे?
तुम मुझे खुन दो,मै तुम्हे आझादी दुंगा
स्वराज्य ह माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणारच..
करा किंवा मरा
आम्हाला कोणाची भीक नको, झगडून हक्क हवेत,
[14] आंबेडकरांच्या स्मारक स्थळाचे नाव काय आहे ?
समता स्थल
चैत्य भूमी
वीर भूमी
बौद्ध भूमी
[15] हरिजन या शब्दाला विरोध कोणी केला?
महात्मा फुले
स्वामी विवेकानंद
पंडित नेहरू
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
हे देखील पहा...
365 दिनविशेष प्रश्नमंजुषा 👉 Special Days Quiz
GK Quiz in Marathi - मराठी मध्ये सामान्यज्ञान चाचणी 👉Start All Quiz Now
Maharashtra State Educational WhatsApp Group
-जीके-क्विज-इन-मराठी-महात्मा-फुले-सामान्य-ज्ञान-प्रश्नमंजुषामहात्मा-फुले-सामान्य-ज्ञान-प्रश्नमंजुषा-Mahatma-Fule-GK-Quiz
-डॉ-बाबासाहेब-आंबेडकर-सामान्य-ज्ञान-प्रश्नमंजुषाडॉ-बाबासाहेब-आंबेडकर-सामान्य-ज्ञान-प्रश्नमंजुषा-Dr-Babasaheb-Ambedkar-GK-Quiz
प्रश्न - बाबासाहेबांचा जन्म कधी झाला?
उत्तर - डॉ भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या मृत्यूनंतर जवळजवळ 34 वर्षांनी त्यांना मरणोत्तर भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार, भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रश्न - डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे गाव कोणते?
उत्तर - बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थान, मध्य प्रदेश, भारतातील महू येथे आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे जन्मस्थान होते, ज्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू येथे झाला होता. जिथे स्थानिक सरकारने हे भव्य स्मारक बांधले.
प्रश्न - डॉक्टर बाबासाहेबांच्या आईचे नाव काय?
उत्तर - भीमाबाई रामजी सकपाळ किंवा भीमाबाई आंबेडकर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई व सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या पत्नी होत्या.
प्रश्न - डॉ आंबेडकरांनी कुठे शिकवले?
उत्तर - 1918 मध्ये ते मुंबईतील सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समध्ये राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक झाले. तो विद्यार्थ्यांसोबत यशस्वी झाला असला तरी, इतर प्राध्यापकांनी त्यांच्यासोबत पिण्याच्या पाण्याचा भांडे वाटून घेण्यावर आक्षेप घेतला.
प्रश्न - आंबेडकरांचा अभ्यास कसा झाला?
उत्तर - बडोद्याचे महाराज गायकवाड यांच्या आर्थिक मदतीमुळे आंबेडकरांनी मुंबईतील एल्फिन्स्टन हायस्कूल आणि एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिक्षण घेतले . 1913 मध्ये, ते गायकवाड यांच्याकडून तीन वर्षांच्या शिष्यवृत्तीवर कोलंबिया विद्यापीठ, न्यूयॉर्कमध्ये शिकण्यासाठी गेले. त्यांनी अर्थशास्त्रात पीएचडी केली आणि नंतर इंग्लंडला गेले.
प्रश्न - आंबेडकरांकडे किती पदव्या होत्या?
उत्तर - आंबेडकरांची शैक्षणिक पदवी यादी, पात्रता. दोन मास्टर्स आणि बार-एट-लॉ व्यतिरिक्त, त्याच्याकडे चार डॉक्टरेट पदवी होती आणि त्याला अनेक युरोपियन भाषा (आणि संस्कृतसह काही भारतीय भाषा) माहित होत्या.
प्रश्न - आपण आंबेडकर जयंती का साजरी करतो?
उत्तर - आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती 14 एप्रिल रोजी बीआर आंबेडकर, भारतीय राजकारणी आणि समाजसुधारक यांच्या स्मरणार्थ पाळली जाते. आंबेडकर यांचा जन्मदिवस 14 एप्रिल 1891 रोजी झाला होता. त्यांचा जन्मदिवस भारतातील काही लोक 'समता दिवस' म्हणूनही ओळखतात.
प्रश्न - डॉ बी आर आंबेडकर यांची भारतीय राज्यघटना तयार करण्यात काय भूमिका आहे?
उत्तर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते ज्यांनी संविधानाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली. संविधानाचा मसुदा सादर करणे, त्यावर उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देणे, संविधान सभेच्या सूचनांनुसार आवश्यक ते बदल करणे ही कामे डॉ. आंबेडकरांनी हाताळली.
प्रश्न - डॉ बी आर आंबेडकर यांना शाळेत कोणत्या दोन समस्या भेडसावत आहेत?
उत्तर - भीम आणि त्याच्या भावाला एल्फिन्स्टन शाळेत दाखल केले. नवीन शाळेतही त्यांना जातीय पूर्वग्रहाचा सामना करावा लागला. ब्राह्मण संस्कृत शिक्षक शूद्रांना वेदांची भाषा शिकवणार नसल्यामुळे त्यांना संस्कृत ही दुसरी भाषा म्हणून घेण्याची परवानगी नव्हती.
प्रश्न - डॉ. बी.आर. आंबेडकर कशासाठी प्रसिद्ध आहेत?
उत्तर - डॉ. बी.आर. आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर या नावाने प्रसिद्ध होते आणि ते भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकारांपैकी एक होते हे सर्वांना माहीत आहे. ते एक अतिशय प्रसिद्ध राजकीय नेते, प्रख्यात कायदेतज्ज्ञ, बौद्ध कार्यकर्ते, तत्त्वज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, वक्ते, लेखक, अर्थशास्त्रज्ञ, विद्वान आणि संपादक होते.
प्रश्न - डॉ. आंबेडकर यांना न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठात त्यांच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती कोणी दिली?
उत्तर - 1913 मध्ये, आंबेडकर अमेरिकेत गेले कारण त्यांना सयाजीराव गायकवाड यांनी तीन वर्षांसाठी शिष्यवृत्ती दिली होती. न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिष्यवृत्तीची रचना करण्यात आली होती.
प्रश्न - डॉ बी आर आंबेडकर यांचे कोणते गुण तुम्हाला का आवडतात?
उत्तर - कार्यक्षमता, प्रामाणिकपणा, क्रांतिकारी, दूरदर्शी वृत्ती, नेतृत्व, अहिंसक वृत्ती आणि महत्त्वाकांक्षी विचार असे विविध गुण त्याच्यात आहेत. या गुणांनी तो तरुण पिढीसाठी आदर्श बनला.
प्रश्न - भारतीय राज्यघटना कोणी लिहिली आहे?
उत्तर - प्रेम बिहारी नारायण रायजादा हे भारतीय राज्यघटनेचे सुलेखनकार होते. मूळ राज्यघटना त्यांनी वाहत्या तिर्यक शैलीत हस्तलिखित केली होती.
प्रश्न - भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी किती कालावधी लागला?
उत्तर - संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला? - संविधान सभेनं दोन वर्षे ११ महिने अठरा दिवस या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केलं.
प्रश्न - प्रथम भारतीय राज्यघटना कधी तयार करण्यात आली?
उत्तर - 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारलेल्या आणि 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आलेल्या भारतीय राज्यघटनेनुसार प्रजासत्ताक शासित आहे.
प्रश्न - आंबेडकर शिक्षणाबद्दल काय म्हणाले?
उत्तर - शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि आंदोलन करा. आंबेडकरांच्या मते, शिक्षण ही एकमेव प्रक्रिया आहे ज्याद्वारे पुरुष आत्मज्ञानी होऊ शकतात. त्यांच्या मते, " शिक्षण म्हणजे जे माणसाला निर्भय बनवते, एकात्मता शिकवते, त्यांचा जन्मसिद्ध हक्क समजून घेते आणि माणसाला स्वातंत्र्यासाठी संघर्ष आणि लढायला शिकवते."
प्रश्न - बाबासाहेब आंबेडकर का प्रसिद्ध आहेत?
उत्तर - आंबेडकर, भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार हे एक विद्वान बरोबरीचे उत्कृष्ट, तत्वज्ञ, एक दूरदर्शी, एक मुक्तिदाता आणि खरे राष्ट्रवादी होते. समाजातील शोषित आणि वंचित घटकांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक सामाजिक चळवळींचे नेतृत्व केले. सामाजिक न्यायाच्या संघर्षाचे प्रतीक म्हणून ते उभे आहेत
प्रश्न - आंबेडकर कशाविरुद्ध लढले?
उत्तर - बी.आर.आंबेडकर हे स्वतः दलित होते, त्यांनी जातिव्यवस्था संपुष्टात आणण्याचा जोरदार पुरस्कार केला आणि दलितांच्या लढ्याला पाठिंबा दिला. त्यांना संविधानाचे जनक म्हणून ओळखले जाते. दलितांसाठी ते आजही पूजनीय आहेत.
प्रश्न - बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह कधी झाला?
उत्तर - रमाई व भीमरावांचे लग्न भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये इ. स. १९०६ या वर्षी झाले. विवाहप्रसंगी बाबासाहेबांचे वय १४ वर्षे तर रमाईचे वय ९ वर्षे होते.
प्रश्न - बी.आर.आंबेडकरांनी समतेसाठी कसा लढा दिला?
उत्तर - आंबेडकरांची समतेची लढाई आणि त्यांच्या राजकीय मोहिमेचे रेखाचित्र रेखाटले जे जातीच्या नियमांवर बहिष्कार टाकण्यासाठी आणि 'अस्पृश्यांना' मंदिरे, विहिरी आणि इतर नागरी संसाधनांमध्ये प्रवेश देण्यासाठी तयार करण्यात आले होते - हे सर्व अस्पृश्यतेच्या प्रथेविरूद्ध सार्वजनिक चेतना वाढवण्याच्या उद्देशाने होते.
प्रश्न - डॉ आंबेडकर दलित समाजाच्या न्याय्य हक्कासाठी का लढले?
उत्तर - आंबेडकर दलितांच्या हक्कासाठी लढले. ते स्वतः दलित होते आणि उच्चवर्णीय लोकांकडून दलितांप्रती दाखवलेल्या भेदभावामुळे ते व्यथित झाले होते .
प्रश्न - दलित चळवळीत महत्त्वाची भूमिका कोणी बजावली?
उत्तर - सर्वात सुप्रसिद्ध दलित नेते डॉ. बी.आर. आंबेडकर (1891-1956) होते, ज्यांनी वसाहती काळात समाजाचे प्रतिनिधित्व केले आणि नंतर भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार म्हणून काम केले.
प्रश्न - बाबासाहेब आंबेडकर यांच्या बायकोचे नाव काय?
उत्तर - सविता (माईसाहेब) आंबेडकर
COMMENTS