1 मे महाराष्ट्र दिन सामन्य ज्ञान प्रश्नमंजुषा | 1 May Maharashtra Din Samanya Dnyan GK Quiz
1 मे महाराष्ट्र दिन सामन्य ज्ञान प्रश्नमंजुषा | 1 May Maharashtra Din Samanya Dnyan GK Quiz
1 मे महाराष्ट्र दिन सामन्य ज्ञान प्रश्नमंजुषा चाचणी - 1 May Maharashtra Din Samanya Dnyan GK Quiz
Please fill the above data!
Generated By School Edutech
Name : Apu
Roll : 9
Total Questions:
Correct: | Wrong:
Attempt: | Percentage:
[1] महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो?
1 जानेवारी
1 एप्रिल
1 मे
[2] महाराष्ट्र दिनादिवशी .............दिन ही साजरा केला जातो.
आंतरराष्ट्रीय राज्य दिन
आंतरराष्ट्रीय कामगार दिन
आंतरराष्ट्रीय सुट्टी दिन
[3] ............. रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.
1 मे 1960
1 मे 1947
1 जानेवारी 1960
[4] 29 नोव्हेंबर 1956 रोजी मुंबई महाराष्ट्रात यावे याकरता आंदोलन करण्यासाठी भव्य मोर्चा मुंबई येथील..........समोरील चौकात जमला होता. फ्लोरा फाउंटन काळा घोडा नरिमन पॉईंट
फ्लोरा फाउंटन
काळा घोडा
नरिमन पॉईंट
[5] 1 मे रोजी महाराष्ट्र आणि.......... या दोन स्वतंत्र राज्यांची निर्मिती झाली.
कर्नाटक
गुजरात
जम्मू काश्मीर
[6] महाराष्ट्राची राजधानी .........आहे.
पुणे
मुंबई
नागपूर
[7] महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री पद यांनी ...........भूषवले.
यशवंतराव चव्हाण
मोरारजी देसाई
पंडित नेहरू
[8] महाराष्ट्राची उपराजधानी ........आहे.
पुणे
नागपूर
मुंबई
[9] .......... या प्राण्याला राज्य प्राण्याचा दर्जा दिला आहे.
वाघ
शेकरू
बैल
[10] भारतात कामगार दिनाची सुरुवात झाली ती ...........मध्ये.
मुंबई
चेन्नई
दिल्ली
1 मे महाराष्ट्र दिन महत्वपूर्ण दिनविशेष प्रश्नमंजुषा ( Important Special Days Quiz)
दिनविशेष स्पर्धा परीक्षेत नेहमीच विचारले जातात. त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थी, शिक्षक याचे करिता महत्त्वाचे दिवस व त्याबरोबर त्या दिवसानिमित्त प्रश्नमंजुषा उपलब्ध करून देत आहोत. वर्ग तीन आणि चार च्या तसेच एमपीएससीच्या परीक्षेत सुद्धा दिनविशेष बद्दल प्रश्न विचारलेले आहे. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेसाठी तयारी होण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची माहिती प्रश्नमंजुषा स्वरुपात मिळणार आहे. संपूर्ण वर्षाचे दिनविशेष (Dinvishesh). दैनंदिन दिनविशेष - घडामोडी, जन्म, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवसांची सविस्तर माहिती Important Days. Check out the the special days of the year
१ मे “महाराष्ट्र दिन” हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. १ मे हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि ते १ मे मोठ्या उत्साहाने साजरा करतात, 1 मे महाराष्ट्र दिनी विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. १ मे महाराष्ट्र दिन तसेच हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो.
1 मे महाराष्ट्र दिन सामन्य ज्ञान माहिती | 1 May Maharashtra Day General Knowledge Information
पार्श्वभूमी
राज्य पुनर्रचना कायदा, १९५६ नुसार भाषांच्या आधारे भारतातील राज्यांसाठी सीमा परिभाषित केल्या गेल्या. या कायद्याचा परिणाम म्हणून जे मुंबई राज्य निर्माण झाले, ते मात्र वेगवेगळ्या मराठी, गुजराती, कच्छी आणि कोकणी भाषा बोलल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रांचे मिळून बनले होते. संयुक्त महाराष्ट्र समिती मुंबई राज्याचे दोन राज्यात विभाजन करण्याच्या चळवळीत आघाडीवर होती; एक भाग जेथे लोक प्रामुख्याने गुजराती आणि कच्छी बोलतात आणि दुसरा भाग जेथे लोक प्रामुख्याने मराठी आणि कोकणी बोलतात.
२५ एप्रिल १९६० रोजी भारतीय संसदेने लागू केलेल्या बॉम्बे पुनर्रचना कायदा, १९६० नुसार या चळवळीचा परिणाम म्हणून महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांची निर्मिती झाली. हा कायदा १ मे १९६० रोजी अंमलात आला
इतिहास
२१ नोव्हेंबर इ.स.१९५६ दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले. त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अढळ सत्याग्रहीं मुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ आंदोलक हुतात्मे झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर इ.स. १९६५मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.
२१ नोव्हेंबर इ. स. १९५६ चे हुतात्मे व हुतात्म्यांची नावे
- सिताराम बनाजी पवार
- जोसेफ डेव्हिड पेजारकर
- चिमणलाल डी. शेठ
- भास्कर नारायण कामतेकर
- रामचंद्र सेवाराम
- शंकर खोटे
- धर्माजी गंगाराम नागवेकर
- रामचंद्र लक्ष्मण जाधव
- के. जे. झेवियर
- पी. एस. जॉन
- शरद जी. वाणी
- वेदीसिंग
- रामचंद्र भाटीया
- गंगाराम गुणाजी
- गजानन ऊर्फ बंडू गोखले
- निवृत्ती विठोबा मोरे
- आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर
- बालप्पा मुतण्णा कामाठी
- धोंडू लक्ष्मण पारडूले
- भाऊ सखाराम कदम
- यशवंत बाबाजी भगत
- गोविंद बाबूराव जोगल
- पांडूरंग धोंडू धाडवे
- गोपाळ चिमाजी कोरडे
- पांडूरंग बाबाजी जाधव
- बाबू हरी दाते
- अनुप माहावीर
- विनायक पांचाळ
- सिताराम गणपत म्हादे
- सुभाष भिवा बोरकर
- गणपत रामा तानकर
- सिताराम गयादीन
- गोरखनाथ रावजी जगताप
- महमद अली
- तुळशीराम पुंजाजी बेलसरे
- देवाजी सखाराम पाटील
- शामलाल जेठानंद
- सदाशिव महादेव भोसले
- भिकाजी पांडूरंग रंगाटे
- वासुदेव सुर्याजी मांजरेकर
- भिकाजी बाबू बांबरकर
- सखाराम श्रीपत ढमाले
- नरेंद्र नारायण प्रधान
- शंकर गोपाल कुष्टे
- दत्ताराम कृष्णा सावंत
- बबन बापू भरगुडे
- विष्णू सखाराम बने
- सिताराम धोंडू राडये
- तुकाराम धोंडू शिंदे
- विठ्ठल गंगाराम मोरे
- रामा लखन विंदा
- एडवीन आमब्रोझ साळवी
- बाबा महादू सावंत
- वसंत द्वारकानाथ कन्याळकर
- विठ्ठल दौलत साळुंखे
- रामनाथ पांडूरंग अमृते
- परशुराम अंबाजी देसाई
- घनश्याम बाबू कोलार
- धोंडू रामकृष्ण सुतार
- मुनीमजी बलदेव पांडे
- मारुती विठोबा म्हस्के
- भाऊ कोंडीबा भास्कर
- धोंडो राघो पुजारी
- ह्रुदयसिंग दारजेसिंग
- पांडू माहादू अवरीरकर
- शंकर विठोबा राणे
- विजयकुमार सदाशिव भडेकर
- कृष्णाजी गणू शिंदे
- रामचंद्र विठ्ठल चौगुले
- धोंडू भागू जाधव
- रघुनाथ सखाराम बीनगुडे
- काशीनाथ गोविंद चिंदरकर
- करपैया किरमल देवेंद्र
- चुलाराम मुंबराज
- बालमोहन
- अनंता
- गंगाराम विष्णू गुरव
- रत्नु गोंदिवरे
- सय्यद कासम
- भिकाजी दाजी
- अनंत गोलतकर
- किसन वीरकर
- सुखलाल रामलाल बंसकर
- पांडूरंग विष्णू वाळके
- फुलवरी मगरु
- गुलाब कृष्णा खवळे
- बाबूराव देवदास पाटील
- लक्ष्मण नरहरी थोरात
- ठमाबाई विठ्ठल सूर्यभान
- गणपत रामा भुते
- मुनशी वझीऱअली
- दौलतराम मथुरादास
- विठ्ठल नारायण चव्हाण
- देवजी शिवन राठोड
- रावजीभाई डोसाभाई पटेल
- होरमसजी करसेटजी
- गिरधर हेमचंद लोहार
- सत्तू खंडू वाईकर
- गणपत श्रीधर जोशी
- माधव राजाराम तुरे(बेलदार)
- मारुती बेन्नाळकर
- मधूकर बापू बांदेकर
- लक्ष्मण गोविंद गावडे
- महादेव बारीगडी
- कमलाबाई मोहिते
- सीताराम दुलाजी घाडीगावकर
- शंकरराव तोरस्कर
365 दिनविशेष प्रश्नमंजुषा 👉 Special Days Quiz
GK Quiz in Marathi - मराठी मध्ये सामान्यज्ञान चाचणी 👉Start All Quiz Now
Maharashtra State Educational WhatsApp Group
1-मे-महाराष्ट्र-दिन-सामन्य-ज्ञान -प्रश्नमंजुषा-1-May-Maharashtra-Din-Samanya-Dnyan-GK-Quiz
COMMENTS