इयत्ता नववी व इयत्ता दहावी विषय योजना व सुधारित अंतर्गत मूल्यमापन योजना. Iyatta 9 vi Iyatta 10 vi Vishay Yojana Sudharit Antargat Mulyamapana Yojana
इयत्ता ९ वी ते इ. १२ वी विषय योजना व मूल्यमापन योजनेचा पुर्नविचार करण्याकरिता शासन निर्णय दि. ९ जुलै, २०१९ अन्वये शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशी विचारात घेऊन इ. ९ वी व इ. १० वी करिता या शासन निर्णयान्वये सन २०१९-२० पासून विषय योजना व सुधारित मूल्यमापन योजना 9 वी व 10 वी मूल्यमापन पद्धती इ. | इयत्ता | 9 वी | 10 वी | नववी | दहावी | प्रचलित | नवीन | सुधारित | अंतर्मूगत | मूल्यमापन | पद्धती | निकष | योजना | कार्य पद्धती |
इयत्ता नववी व इयत्ता दहावी विषय योजना व सुधारित मूल्यमापन योजना.
![]() |
इयत्ता 9 वी व 10 वी विषय योजना व सुधारित मूल्यमापन योजना |
सन २०१९-२० पासून इ.९ वी व इ. १० करिता विषय योजना व सुधारित मूल्यमापन योजना खाली नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.
१) लेखी मूल्यमापनासोबत विद्यार्थ्याच्या वेगवेगळ्या क्षमतांचे मापन करण्यासाठी तसेच विद्यार्थ्याच्या प्रगतीचे सातत्यपूर्ण मूल्यमापन होण्यासाठी अंतर्गत मूल्यमापन समाविष्ट करण्यात येत आहे.
२) इ. ९ वी व इ. १० करिता भाषा आणि सामाजिक शास्त्रे या विषयांकरिता लेखी परीक्षेव्दारे मूल्यमापन ८० गुणांचे व अंतर्गत मूल्यमापन २० गुणांचे राहील.
३) इ. १० वीची अंतिम परीक्षा (राज्य मंडळामार्फत घेण्यात येणारी ही केवळ इ. १० वीच्या अभ्यासक्रमावरआधारित असेल.
४) अंतर्गत मूल्यमापनामध्ये विद्याथ्र्यांकरिता द्यावयाचे प्रकल्प हे समावेशित स्वरूपाचे असतील व हे प्रकल्प शिक्षकांनी विद्यार्थ्याकडून वर्गात करून घ्यावेत.
५) इ.९ वी व इ. १० वीच्या अंतिम परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व घटकनिहाय गुणभार राज्य मंडळ स्तरावर संबंधित विषयांच्या अभ्यास समितीच्या अभ्यास गटाच्या सहायाने निश्चित केले जाईल.
६) इ.९ वी व इ. १० मध्ये उत्तीर्ण होण्याकरिता विद्यार्थ्यास प्रत्येक विषयात लेखी व अंतर्गत मूल्यमापन • मिळून किमान ३५ टक्के गुण प्राप्त करणे अनिवार्य राहील.
७) राज्य मंडळाच्या प्रचलीत निकषाप्रमाणे सवलतीच्या गुणांची तरतूद (Grace Marks System) सुरू राहील तसेच शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला व क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या / सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारे सवलती अतिरिक्त गुण प्रचलीत निकषाप्रमाणे सुरू राहतील.
८) इ. ९ वी व इ. १० वी साठी विषय योजना, मूल्यमापन योजना व परीक्षेचा कालावधी याबद्दलचा तपशील सोबत दिल्याप्रमाणे आहे.
इ. ९ वी साठी विषयनिहाय मूल्यमापन योजना
• भाषा विषयांसाठी लेखी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनाची गुणविभागणी पुढीलप्रमाणे
तोंडी परीक्षेकरिता पुढील २ कौशल्ये निवडण्यात यावीत.
१. परिच्छेद ऐकून त्यावर आधारित विचारलेल्या वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे लिहिणे (किमान ५ प्रश्न)
२. ५ वाक्य किंवा १० शब्द ऐकून लिहिणे..
३. कविता ऐकून त्यावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे लिहिणे (किमान ५)
४. Audio Clip ऐकून त्यावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे लिहिणे (किमान ५)
१. वाचन केलेल्या कोणत्याही एका पुस्तकाविषयीचे स्वमत प्रकट करावे.
२. दिलेल्या विषयांवर विचार प्रकट करावे (सदर विषय विद्यार्थ्यांच्या अनुभव विश्वाशी सुसंगतअसावेत).
३. पाठ्यपुस्तकातील पाठ किंवा कविता यावर ८ ते १० वाक्यांमध्ये आपले विचार प्रकट करावेत.
➤भाषा विषयांच्या अंतर्गत मूल्यमापनातील तोंडी परीक्षेचे प्रत्येक विद्यार्थ्याचे कौशल्यातील ज्या पर्यायाची निवड केली आहे, त्याप्रमाणे) खालील अभिलेख शाळा स्तरावर जतन करणे अनिवार्य राहील.
१) श्रवण कौशल्य (उदा. श्रवण, आकलनाच्या उत्तरपत्रिका जमा करणे).
२) भाषण कौशल्य (उदा. वाचलेल्या पुस्तकाबद्दल विद्यार्थ्यांचे स्वमत).
भाषा विषय उत्तीर्णतेचे निकष
•परीक्षा प्रथम सत्र- १०० गुण द्वितीय सत्र- १०० गुण = २०० / २ = १०० गुण सरासरी. याप्रमाणे ३ भाषांचे १०० प्रमाणे सरासरी ३०० गुण.
•३०० गुणांच्या तीन भाषा विषयांचा गट उत्तीर्णतेसाठी एकत्रित असेल. या तीन भाषा विषयांच्या एकत्रित गटामध्ये उत्तीर्णतेसाठी किमान १०५ गुण आवश्यक राहील. त्यापैकी १०० गुणांच्या भाषा विषयांमध्ये किमान २५ व दोन्ही संयुक्त भाषा विषयांमध्ये मिळून किमान २५ गुण प्राप्त होणे आवश्यक राहील.
10 वी मराठी, हिंदी, इंग्रजी विषय तोंडी परीक्षा प्रश्नपत्रिका अंतर्गत मूल्यमापन
गणित विषयासाठी लेखी आणि अंतर्गत मूल्यमापनाची गुणविभागणी पुढीलप्रमाणे
प्रथम सत्र परीक्षा १०० गुण द्वितीय सत्र परीक्षा - १०० गुण २०० / २= १०० गुण सरासरी.
10 वी गणित अंतर्गत मूल्यमापन, गृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी MCQ
विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयासाठी लेखी आणि अंतर्गत मूल्यमापनाची गुणविभागणी पुढीलप्रमाणे
दहावी विज्ञान आणि तंत्रज्ञान अंतर्गत मूल्यमापन, प्रकल्प, प्रात्यक्षिक वही, गृहपाठ | 10th Science Internal Evaluation, Project, Practical Book, Home work
गणित व विज्ञान विषय उत्तीर्णतेचे निकष
• उत्तीर्णतेसाठी गणित व विज्ञान विषयांचा एक गट असेल. दोन्ही विषयाच्या एकत्रित गटामध्ये उत्तीर्णतेसाठी २०० गुणांपैकी किमान ७० गुण प्राप्त होणे आवश्यक आहे व त्यापैकी प्रत्येक विषयात किमान २५ गुण प्राप्त होणे आवश्यक राहील.
सामाजिक शास्त्रे विषयासाठी लेखी आणि अंतर्गत मूल्यमापनाची गुणविभागणी पुढीलप्रमाणे
अंतर्गत मूल्यमापन = २० गुण (प्रथम व द्वितीय सत्रासाठी प्रत्येकी)
इ. १० वी साठी विषयनिहाय मूल्यमापन योजना
➤इ. १० वीच्या शैक्षणिक वर्षामध्ये प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा (Preliminary Examination) या इ.९वी च्या विषयनिहाय मूल्यमापन आराखडयाप्रमाणे आयोजित केल्या जातील.
➤राज्य मंडळामार्फत आयोजित माध्यमिक शालान्त (इ.१० वी) परीक्षा पुढील मूल्यमापन योजनेप्रमाणे राहील.
• भाषा विषयांसाठी लेखी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनाची गुणविभागणी पुढीलप्रमाणे
श्रवण कौशल्य- (खालीलपैकी कोणतेही एक) (५ गुण)
१. परिच्छेद ऐकून त्यावर आधारित विचारलेल्या वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे लिहिणे (किमान ५ प्रश्न)
२. वाक्य किंवा १० शब्द ऐकून लिहिणे.
३. कविता ऐकून त्यावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे लिहिणे (किमान ५)
४. Audio Clip ऐकून त्यावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नाची उत्तरे लिहिणे (किमान ५)
भाषण कौशल्य (खालीलपैकी कोणतेही एक) (५ गुण)
१. वाचन केलेल्या कोणत्याही एका पुस्तकाविषयीचे स्वमत प्रकट करावे.
२. दिलेल्या विषयांवर विचार प्रकट करावे (सदर विषय विद्यार्थ्यांच्या अनुभव विश्वाशी सुसंगत असावेत).
३. पाठ्यपुस्तकातील पाठ किंवा कविता यावर ८ ते १० वाक्यांमध्ये आपले विचार प्रकट करावेत.
४. भाषा विषयांच्या अंतर्गत मूल्यमापनातील तोडी परीक्षेचे प्रत्येक विद्यार्थ्याचे कौशल्यातील ज्या पर्यायाची निवड केली आहे, त्याप्रमाणे) खालील अभिलेख शाळा स्तरावर जतन करणे अनिवार्य राहील.
२) भाषणकौशल्य (उदा. कोणत्याही वाचलेल्या एका पुस्तकाबाबत विद्यार्थ्याचे स्वमत.)
भाषा विषय उत्तीर्णतेचे निकष
३०० गुणांच्या तीन भाषा विषयांचा गट उत्तीर्णतेसाठी एकत्रित असेल. या तीन भाषा विषयांच्या एकत्रित गटामध्ये उत्तीर्णतेसाठी किमान १०५ गुण आवश्यक राहील. त्यापैकी १०० गुणांच्या भाषा विषयांमध्ये किमान २५ व दोन्ही संयुक्त भाषा विषयांमध्ये मिळून किमान २५ गुण प्राप्त होणे आवश्यक राहील.
• गणित विषयासाठी लेखी आणि अंतर्गत मूल्यमापनाची गुणविभागणी पुढीलप्रमाणे राहील.
गणित भाग १ (बीजगणित)- ४० गुण
गणित भाग २ (भूमिती)- ४० गुण
•अंतर्गत मूल्यमापन- २० गुण
= १० गुण
२. प्रात्यक्षिक परीक्षा / बहुपर्यायी प्रश्न परीक्षा (भाग १- १० गुण व भाग २-१० गुण) या २० गुणांचे रूपांतर १० गुणांत करावे.
• विज्ञान व तंत्रज्ञान विषयासाठी लेखी आणि अंतर्गत मूल्यमापनाची गुणविभागणी पुढीलप्रमाणे राहील.
विज्ञान भाग १ - ४० गुण
विज्ञान भाग २- ४० गुण
• उत्तीर्णतेसाठी गणित व विज्ञान विषयाचा एक गट असेल. दोन्ही विषयांच्या एकत्रित गटामध्ये उत्तीर्णतेसाठी २०० गुणांपैकी किमान ७० गुण प्राप्त होणे अनिवार्य असेल व त्यापैकी प्रत्येक विषयात किमान २५ गुण प्राप्त होणे अनिवार्य राहील.
• सामाजिक शास्त्रे विषयासाठी लेखी आणि अंतर्गत मूल्यमापनाची गुणविभागणी पुढीलप्रमाणे राहील.
जलसुरक्षा हा विषय श्रेणी विषयामध्ये नव्याने समाविष्ट करण्यात येत असून पुढील वर्षापासून (सन २०२०-२१) हा विषय स्वविकास व कलारसास्वाद या श्रेणीविषयाऐवजी श्रेणी व अनिवार्य स्वरूपाचा असेल व स्वविकास व कलारसास्वाद हा विषय सरक्षण शास्त्राला अन्य पर्यायी विषयासोबत उपलब्ध असेल.
हे हि वाचा...
हे हि वाचा...
इयत्ता 10 वी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा विषय तोंडी परीक्षा नमुना प्रश्नपत्रिका / अंतर्गत मूल्यमापन 👉 Downlaod All pdf files
10 वी गणित अंतर्गत मूल्यमापन, गृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी MCQ 👉 Downlaod All pdf files
इयत्ता १० वी / 9 वी विज्ञान आणि तंत्रज्ञान अंतर्गत मूल्यमापन, प्रकल्प, उपक्रम, प्रात्यक्षिक- प्रयोगवही, गृहपाठ | 10th Science Internal Evaluation, Project, Practical Book, Home work 👉 Downlaod All pdf files
इयत्ता 10 वी सामाजिक शास्रे अंतर्गत मूल्यमापन 👉 Downlaod All pdf files
आरोग्य व शारीरिक शिक्षण अंतर्गत मूल्यमापन | Internal Evaluation of Health and Physical Education 👉 Downlaod All pdf files
इयत्ता 9 वी व 10 वी - जलसुरक्षा विषयाचे अंतर्गत मूल्यमापन | Internal Evaluation of Water Security subject 9th and 10th 👉 Downlaod All pdf files
इयत्ता 9 वी व 10 वी - संरक्षणशास्त्र अंतर्गत मूल्यमापन | Defense Studies Internal Assessment Class 9th and 10th 👉 Downlaod All pdf files

इ 10 वी विज्ञान विषयाचे प्रकरण वाईज गुणदान असेल तर पाठवा
उत्तर द्याहटवा