पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी २ चे गुण PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर ॲपवर नोंदवावेत पायाभूत संकलित चाचणीचे गुण.
PAT 3 ची माहिती भरताना वारंवार येणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय
PAT 3 वारंवार येणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय.
PAT 3 ची माहिती भरताना अनेक समस्या वारंवार येतात या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी देण्यात आलेली आहेत.
विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे
PAT - 3 माहिती भरताना वारंवार उद्भवणाऱ्या प्रश्नांची उत्तरे
समस्या १ - Invalid U-DISE कोड
आपल्या शालार्थ पोर्टलवर शाळेचा UDISE कोड बरोबर असल्याची खात्री करा. चुकीचा UDISE कोड असल्यास मुख्याध्यापक / DDO-१ यांनी शालार्थ पोर्टलवर अपडेट करावा व गटशिक्षणअधिकारी /DDO-२ यांनी approval घेण्यात यावे.
तरीही प्रश्न सुटत नसल्यास तालुका समग्र शिक्षा डेटा ऑपरेटरशी संपर्क करुन UDISE कोडची पडताळणी करावी.
समस्या २ - Invalid मोबाईल क्रमांक
सध्या वापरात असलेला मोबाईल क्रमांक मुख्याध्यापक / DDO-१ यांनी शालार्थ पोर्टलवर अपडेट करावा व गटशिक्षणअधिकारी/DDO-२ यांनी approval दिल्यानंतर किमान ८ दिवस प्रतिक्षा करा.
समस्या ३ - Invalid शालार्थ / शिक्षक आय.डी.
मुख्याध्यापक / DDO-१ यांच्याकडून शालार्थ पोर्टलवरून अचूक शिक्षक आय. डी. प्राप्त करून घ्यावा.
समस्या ४ - शून्य शिक्षक असलेली शाळा
सध्या माहिती भरू नये. अधिकृत शिक्षक नेमणुकीनंतर माहिती भरावी.
समस्या ५ - सर्व शिक्षकांची नावे समाविष्ट नाहीत किंवा पूर्वीच्या शिक्षकांची नावे दिसत आहे.
शालार्थ पोर्टल व UDISE प्लसवर शिक्षकांच्या बदलीची नोंद घेऊन यादी अद्ययावत करावी.
समस्या ६ मागील वर्गातील विद्यार्थ्यांची नावे दिसत आहेत.
विद्यार्थ्यांचे सरल पोर्टलवर पुढील वर्गात प्रमोशन करावे व यादी अपडेट करावी.
समस्या ७ शिक्षण हमी कार्ड दिलेले विद्यार्थी
सदर विद्यार्थ्यांची सरल पोर्टलवर New Tab घेऊन इयत्तनिहाय नोंद करावी. New Tab करता तालुका समग्र शिक्षा ऑपरेटरशी संपर्क करावा.
समस्या ८ सर्व विद्यार्थ्यांची नावे समाविष्ट नाहीत ~
आपल्या वर्गातील मुलांची नावे सरल व UDISE पोर्टलवर अद्ययावत करावी. त्यानंतर यादी उपलब्ध होईल. दुसऱ्या शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांची सरल पोर्टलवर त्या शाळेत ट्रान्स्फर करावी.
समस्या ९ - केवळ शालार्थ प्रणालीमध्ये वेतन
सध्या केवळ शालार्थ प्रणालीमध्ये वेतन असणाऱ्या शिक्षकांना सदर माहिती भरता येते. आश्रमशाळा, समाजकल्याण विभागाच्या शाळा, सराव पाठशाळा, आदिवासी विभागाच्या शाळा, OBC कल्याण व मदरसा इ. शाळांना सध्या माहिती भरण्यास Access देण्यात आलेले नाहीत. याबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
टीप : आपल्या शाळेतील कोणत्याही शिक्षकाचे लॉग इन होत असेल तर त्यांच्या लॉग इन वरून सर्व इयत्तांची माहिती भरावी.
सदर प्रश्न उत्तर ची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी खालील बटनाला टच करा.
PAT 3 वारंवार येणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय
STARS प्रकाल्पामधील SIG २ limproved Learning Assessment -System नुसार सन २०२३ २४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी २ चे आयोजन शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी २, घेण्यात आलेली आहे. सदर पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी २ शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच चाचणीचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर देण्यात आलेल्या आहेत. pat-chatbot-payabhut-sanklit-mulymapan-chachani-marks PAT-Chatbot-Sankalit-Chachani-1-Online-Marks
पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी २ गुण PAT महाराष्ट्र चाटबॉटवर नोंदविणे
विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र हा चाटबॉट पायाभूत चाचणीचे गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर पायाभूत चाचणीचे गुण शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर पायाभूत चाचणीचे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना व याबाबतच्या व्हिडीओची यु-ट्यूब लिंक सोबत देण्यात येत आहे.
SCERT PAT 3 Training: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (विद्या समीक्षा केंद्राच्या) (VSK) मार्फत, संकलित मूल्यमापन 2 चाचणी (PAT 3) चे गुण चाटबॉट वर भरण्यासाठी सदर गुणांचे पद्धती यावे, याची यूट्यूबवर प्रशिक्षण मिळविणार आहे. आपल्या यु-ट्यूब लाईव्ह प्रशिक्षणाची लिंक या लिंकवर काढून दिली जाईल. या क्रमांकानुसार, राज्यातील इयत्ता तिसरी ते आठववी वर्गाच्या सर्व शिक्षकांनी दि 15 एप्रिल 2024 रोजी दुपारी 12: 00 वाजता आयोजित करण्यात आलेले होते.
संकलित मूल्यमापन 2 चाचणी (PAT 3) चे गुण चाटबॉट वर भरण्यासाठी : SCERT PAT 3 Training
SCERT PAT 3 Training: संकलित मूल्यमापन 2 चाचणी (PAT 3) चे गुण चाटबॉट वर भरण्यासाठी प्रशिक्षणाला जॉइन होण्यासाठी मार्ग
SCERT मधील विद्या समीक्षा (VSK), केंद्रामार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉट संकलित मूल्यमापन - 2 (PAT-3 ) गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
यावर संकलित मूल्यमापन - 2 (PAT-3 )चे गुण शिक्षकांनी गुण नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर संकलित मूल्यमापन - 2 (PAT-3)चे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याबाबत यु-ट्युबद्वारे ऑनलाईन मार्गदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे.
आपण आपल्या अधिनस्त असणाऱ्या सर्व शाळेतील शिक्षकांना हे प्रशिक्षण घेणे बाबत आदेशित करावे. व आपण ही स्वतः ऑनलाईन जॉईन व्हावे. आशा सूचना विभागीय शिक्षण उपसंचालक(सर्व), उपसंचालक, प्रादेशिक विद्याप्रधिकरण (सर्व), प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व), शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) सर्व, शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर/ दक्षिण/ पश्चिम, प्रशासन अधिकारी (म.न. पा., न. पा.,न. प.),सर्व यांना संचालक मा. शरद गोसावी साहेब , राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी दिल्या आहेत.
संकलित चाचणी क्रमांक एक दिवाळी अगोदर घेण्यात आली होती पायाभूत चाचणी प्रमाणे या चाचणीचे गुण देखील ऑनलाइन नोंदविले होते आता संकलित चाचणी क्रमांक दोनची गुण नोंदवण्यासाठी सदर सुविधा उपलब्ध झालेली आहे.ऑनलाइन गुण नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली गुण नोंदवता येत आहे.
संकलित मूल्यमापन 2 चे गुण PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर कसे नोंदवावेत ?
1. Android उपकरणांसाठी Play Store वरून Swiftchat ॲप डाउनलोड करा आणि नोंदणी करा...
Swiftchat ॲप डाउनलोड करा आणि नोंदणी करा
2. नोंदणी केल्यानंतर PAT महाराष्ट्र VSK चॅटबॉटवर जाण्यासाठी चॅटबॉट लिंक वापरा
VSK चॅटबॉटवर जाण्यासाठी चॅटबॉट लिंक
3. बेसलाइन परीक्षेसाठी गुण कसे सबमिट करायचे हे समजून घेण्यासाठी दिलेल्या वापरकर्ता मॅन्युअलमधील सूचनांचे अनुसरण करा.
वापरकर्ता मॅन्युअल
4. दिलेल्या आधारभूत चाचणीतील सर्व प्रश्नांसाठी गुण सबमिट करावेत अशी सर्वांना विनंती.
5. दिलेल्या विषयाचे गुण सबमिट केल्यावर वेगळ्या विषयाचे गुण भरण्यासाठी होम मेनूवर जाऊ शकतात.
6. चुकून भरलेल्या मार्क होम मेनू मध्ये जाऊन परत भरता येईल आणि डेटा लेटेस्ट कॅप्चर होईल.
पायाभूत चाचणीचे गुण PAT (महाराष्ट्र)या चॅटबॉटवर शिक्षकांनी नोंदविणे - STARS प्रकlल्पामधील SIG - 2 Iimproved Learning Assessment System नुसार सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी २ चे आयोजन करण्यात येत आहे
PAT पायाभूत चाचणी गुणनोंद चॅटबॉटवर कशी करावी?
पायाभूत चाचणीचे गुण PAT (महाराष्ट्र)या चॅटबॉटवर शिक्षकांनी नोंदविणे- राज्यात पायाभूत चाचणीचे आयोजन दि. १७ ते १९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा- इंग्रजी या विषयांची पायाभूत चाचणी घेण्यात आलेली आहे. सदर पायाभूत चाचणी शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच चाचणीचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील असेही कळविण्यात आलेले होते.
विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चॅटबॉट पायाभूत चाचणीचे गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर पायाभूत चाचणीचे गुण शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे*. सदर चाटबॉटवर पायाभूत चाचणीचे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना व प्रशिक्षण घेतल्यानंतर शिक्षकांनी 🧿पायाभूत चाचणीचे गुण दि. १४ ते १८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर नोंदविणे आवश्यक आहे
शासन परिपत्रक
PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटबॉट मार्गदर्शिका PDF
PAT (महाराष्ट्र) चाटबॉट ॲप लिंक
SCERT Maharashtra संकलित मूल्यमापन १ चे गुण PAT महाराष्ट्र या ChatBoat वर भरणेबाबत प्रशिक्षण
शंका समाधान
VSK राज्य समन्वयक यांचेशी आपल्याला आलेल्या काही प्रॉब्लेम बाबत चर्चा झाल्या नंतर राज्यस्तरावर याबाबत technical team सोबत चर्चा सूरु आहे
आपण खालील मुद्द्याच्या अनुषंगाने PAT चे काम करा
- 1. ज्यांचे शालार्थ ID आहेत अशाच शिक्षकांनी गुण भरावेत,आश्रमशाळा व अन्य सेवार्थ मधील शिक्षकांनी भरू नये
- 2 इयत्ता 5 वि इंग्रजी विषयाच्या गुणांकनात तफावत असल्याने सध्या इंग्रजी वगळून इतर गुण भरावेत,2 दिवसात इंग्रजी बाबत बदल होणार आहे.
- 3. जे विद्यार्थी BOT मध्ये दिसत नाहीत त्यांचे गुण भरता येणार नाही,याबाबत DATA UPDATE चे काम सुरू आहे.
- 4. काही वेळा इयत्ता select होते मात्र विद्यार्थी दिसत नाही ,काळजी करू नका ते नंतर भरण्यासाठी वेळ दिला जाईल
- 5. जे विद्यार्थी दुसऱ्या शाळेत किंवा दुसऱ्या शाळेतून आलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत हजर किंवा गैरहजर काही करु नयेत. ते विद्यार्थी तसेच असुदेत.
- 6. काही शिक्षकांच्या अन्य ठिकाणी बदल्या झाल्याने सध्याच्या शाळेत नाव दिसत नाही,त्या ठिकाणी सध्या जैसे थे असू द्या
- 7.*ज्या शाळेवर शिक्षक नाहीत मात्र अन्य शाळेतील शिक्षक व्यवस्थापन करतात,अशा शाळेतील विद्यार्थ्यांचे गुण सध्या भरू नये
*सप्टेंबर 2023 ला सर्व deta update झाल्यानंतर त्या शाळेचे गुण भरता येतील. ..
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
चॅटबोट पायाभूत चाचणीचे गुण भरण्यासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना
विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चॅटबोट पायाभूत चाचणीचे गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. पावर पायाभूत चाचणीचे गुण शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर पायाभूत चाचणीचे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना खालील pdf मध्ये देण्यात आलेल्या आहेत.
पायाभूत संकलित चाचणीचे गुण PAT महाराष्ट्र चाटबॉटवर नोंदविणे संदर्भातील शासन पत्रक खाली दिलेले आहे. यात सविस्तर माहिती दिलेली आहे.
*संकलित मूल्यमापन 2 चे गुण PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर कसे नोंदवावेत?*
(सविस्तर पहा,खालील लिंकवर उपलब्ध) 👇🏻
▪ परिपत्रक
▪ मार्गदर्शिका PDF
▪ मार्गदर्शक SCERT व्हिडीओ
▪ Swift Chat ऍप्स लिंक
▪ PAT BOT थेट लिंक
▪ तांत्रिक अडचण आल्यास खालील लिंकवर प्रतिसाद /तक्रार नोंदवा.
COMMENTS