राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २२ ते २८ जुलै, २०२४ या कालावधीत "शिक्षण सप्ताह" साजरा करणेबाबत संचालक यांचे परिपत्रक
दिनांक 22 ते 28 जुलै 2024 या कालावधीमध्ये राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षण सप्ताह साजरा करणेबाबत विविध उपक्रमांचे नियोजन !
दिनांक २२ ते २८ जुलै, २०२४ शिक्षण सप्ताह" साजरा करणे बाबत..
सदर शिक्षण सप्ताह हा राज्यातील विद्यार्थी , शिक्षक , तसेच भागधारक व धोरणकर्ते यांच्यांमध्ये सहकार्य वाढविणारा ठारणार असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत . याबाबत राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी , प्राथमिक व माध्यमिक सर्व , प्रशासन अधिकारी नपा / नप/ मनपा सर्व व शिक्षण निरीक्षक ( दक्षिण , पश्चिम व उत्तर ) यांच्याप्रति राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण मार्फत परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत .
दिनांक 22 जुलै 2024 पासुन ते दिनांक 28 जुलै 2024 पर्यंत दिनांकानिहाय उपक्रम पुढीलप्रमाणे पाहुयात ..
दिनांक | उपक्रम |
दि.22.07.2024 | अध्ययन अध्यापक साहित्य दिवस |
दि.23.07.2024 | मुलभुत संख्याज्ञान व साक्षरता दिवस |
दि.24.07.2024 | क्रिडा दिवस |
दि.25.07.2024 | सांस्कृतिक दिवस |
दि.26.07.2024 | कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस |
दि.27.07.2024 | मिशन लाईफच्या दृष्टीक्षेपात इको क्लब उपक्रम / शालेय पोषण दिवस |
दि.28.07.2024 | समुदाय सहभाग दिवस |
वरीलप्रमाणे शि. सप्ताहाचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
शिक्षण सप्ताह हा अंगणवाडी केंद्रामध्ये देखील राबविणेबाबत सूचित केले आहे. त्याअनुषंगाने शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी आपल्या जिल्ह्यातील माहिला व बालविकास विभागाशी संपर्क व समन्वय ठेऊन योजनेची अंगणवाडी केंद्रामध्ये यशस्वीरीत्या अंमलबजावणी होईल याची दक्षता घ्यावी.
तरी उपरोक्त प्रमाणे राज्यामध्ये शिक्षण सप्ताहाची यशस्वीरीत्या अंमलबजावणी करण्यासाठी आपण आपल्या स्तरावरून सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व मंडळाच्या, सर्व माध्यमांच्या शाळांना सूचना देण्यात याव्यात.
तसेच सोबतच्या परिशिष्ट १ ते ७ मधील मार्गदर्शक सूचनांनुसार शि.सप्ताहामधील उपरोक्त तक्त्यातील उपक्रमांची अंमलबजावणी नेमून दिलेल्या कालावधीत आपण पूर्ण करावी.
शि. सप्ताहादरम्यान आयोजित उपक्रमांची छायाचित्रे व माहिती Tracker वर upload करणेबाबत दिलेल्या विहीत नमुन्यामध्ये माहिती जतन करून ठेवावी व मा. आयुक्त (शिक्षण) यांच्या निर्देशानुसार कार्यवाही करावी.
छायाचित्रे व माहिती Tracker वर upload करणे
दिवस पाचवाा - शुक्रवार दि. 26 जुलै, 2024 कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस (Skilling and Digital Initiatives Day)
शिक्षण सप्ताह आयोजित करणेबाबत शासन परिपत्रक पहा
शिक्षण सप्ताह उपक्रम परिशिष्टे 1 ते 7 पहा
उपक्रमाचे फोटो अपलोड करण्याची SCERT ची अधिकृत link
शिक्षण सप्ताह
Good information
उत्तर द्याहटवा