mukhyamantri-majhi-shala-sundar-shala-tappa-2 मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा - 2 (2024-2025) CM Majhi Shala Sundar Shala Abhiyan Registration
mukhyamantri-majhi-shala-sundar-shala-tappa-2 मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा - 2 (2024-2025) CM Majhi Shala Sundar Shala Abhiyan Registration, 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान' टप्पा - 2 - शासन निर्णय | मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा - 2 नोंदणी, मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा - 2 मूल्यमापन निकष, बक्षिस योजना, मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान नोंदणी लिंक सुरू...
राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' टप्पा - 2 हे अभियान राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान' अंतर्गत शाळांचे मूल्यांकन करणार.
‘माझी शाळा सुंदर शाळा’चा दुसरा टप्पा 5 ऑगस्टपासून
मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा’ अभियान पहिल्या टप्प्यात यशस्वी झाल्यानंतर त्याचा दुसरा टप्पा राज्य शासनाने हाती घेतला आहे.
‘मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा’ अभियान पहिल्या टप्प्यात यशस्वी झाल्यानंतर त्याचा दुसरा टप्पा राज्य शासनाने हाती घेतला आहे. येत्या ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या महिनाभरात अभियानाचा कालावधीत राबविले जाईल. त्यानंतर ५ ते १५ सप्टेंबर या काळात मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा आदी घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना देण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे. (Second phase of mazi shala sundar shala project from 5 August in state )
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा - 2 मार्गदर्शन व्हिडिओ आवश्यक पहा...
अधिक माहितीसाठी संपूर्ण शासन निर्णय download करा.
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा माहिती भरण्यासाठी, आवश्यक असणारे जुनी फोटो यादी पहा
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टाईप करावयाची जुनी माहिती Word / Text फाईल साठी येथे click करा
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा माहिती भरण्यासाठी, लिंक
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा मार्गदर्शिका manual download करा
१. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा - 2 अभियानाची व्याप्ती-:
i) राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी सदर अभियानात सहभागी होणे अपेक्षित आहे.शासन निर्णय क्रमांकः मुमंअ २०२४/प्र.क्र.५२/एसडी-६
11) या अभियानासाठी शाळांची विभागणी अ) शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व ब) उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारीत करण्यात येत आहे. याचा अर्थ प्राथमिक स्तरापासून राज्य स्तरापर्यंत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळांशी स्पर्धा करणार नाहीत. प्रत्येक स्तरावरील विजेता या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येईल.
iii)सदर अभियान अ) बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र ब) वर्ग अ व वर्ग ब च्या महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र तसेच क) उर्वरित महाराष्ट्र अशा स्तरांवर खालीलप्रमाणे राबविण्यात येईल
२. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा - 2 अभियानाची उद्दिष्टे :-
i) शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा इत्यादी घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना देणे.
ii) शासनाच्या ध्येय धोरणाशी सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे.
iii) शालेय शिक्षणाच्या दृष्टीकोनातून सर्वाधिक महत्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादणूक या घटकाच्या वृद्धीस प्रोत्साहन देणे.
३. अभियानाचा कालावधी:-
i) दि. २९ जुलै ते दि.०४ ऑगस्ट, २०२४ हा कालावधी अभियानाच्या पूर्व तयारीसाठी असेल या कालावधीत अभियानाची माहिती राज्यातील सर्व शाळांमध्ये पोहोचेल याची दक्षता आयुक्त (शिक्षण) यांच्या मार्गदर्शनानुसार विभागाच्या अधिकाधिक क्षेत्रीय कार्यालयांनी घ्यावी. सर्व शाळांनी या अभियानात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी याबाबत सर्वतोपरी प्रयत्न या कालावधीत करण्यात यावेत.
(11) दि.५ ऑगस्ट २०२४ रोजी औपचारिक कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरुवात होईल व हे अभियान एक महिना कालावधीसाठी असेल दि.०४ सप्टेंबर २०२४ रोजी अभियानाचा कालावधी पूर्ण होईल.दि.०५ सप्टेंबर २०२४ ते दि. १५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडण्यात यावी.
iv) त्यानंतरच्या सुयोग्य दिनांकास या अभियानाचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होईल.
४. अभियानाचे स्वरूप:-
४. १ अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना खालीलप्रमाणे गुणांकन देण्यात येईल.
अ) पायाभूत सुविधा - ३३ गुण
ब) शासन ध्येय धोरण अंमलबजावणी ७४ गुण
क) शैक्षणिक संपादणूक - ४३ गुण
स्वराज्य संस्थांच्या शाळेस जिल्हा निहाय पहिल्या. दुसन्या व तिसन्या क्रमांकाकरिता अनुक्रमे रु.११.०० लक्ष रु.५.०० लक्ष व रु. ३.०० लक्ष इतक्या रकमेचे पारितोषिक अनुज्ञेय असेल. अशाच प्रकारचे पारितोषिक इतर व्यवस्थापनांच्या शाळांना अनुज्ञेय असेल
मनपास्तरावर शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेस पहिल्या दुसन्या ब तिस-या क्रमांकाकरिता अनुक्रमे रु.२१.०० लक्ष रु.१५.०० लक्ष व रु.११.०० लक्ष इतक्या रकमेचे पारितोषिक अनुज्ञेय असेल. अशाच प्रकारचे पारितोषिक इतर व्यवस्थापनांच्या शाळांना अनुज्ञेय असेल
४.५.३ उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्र :-
तालुकास्तरावरील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना पहिल्या. दुसन्या व तिस-या क्रमांकाच्या शाळेस अनुक्रमे रु. ३.०० लक्ष रु.२.०० लक्ष व रु.१.०० लक्ष इतक्या रकमेचे पारितोषिक अनुज्ञेय असेल. अशाच प्रकारचे पारितोषिक इतर व्यवस्थापनांच्या शाळांना अनुज्ञेय असेल.
जिल्हास्तरावरील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना पहिल्या, दुसन्या व तिस-या क्रमांकाच्या शाळेस अनुक्रमे रु. ११.०० लक्ष रु.५.०० लक्ष व रु.३.०० लक्ष इतक्या रकमेचे पारितोषिक अनुज्ञेय असेल. अशाच प्रकारचे पारितोषिक इतर व्यवस्थापनांच्या शाळांना अनुज्ञेय असेल.
विभागस्तरावरील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना पहिल्या दुसन्या ब तिस-या क्रमांकाच्या शाळेस अनुक्रमे रु. २१.०० लक्ष रु.१५.०० लक्ष व रु.११.०० लक्ष इतक्या रकमेचे पारितोषिक अनुज्ञेय असेल. अशाच प्रकारचे पारितोषिक इतर व्यवस्थापनांच्या शाळांना अनुज्ञेय असेल.
४.५.४ राज्य स्तरावरील स्पर्धा :-
बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रथम क्रमांकाची शाळा. अ व ब वर्ग महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रथम क्रमांकाची शाळा तसेच उर्वरित महाराष्ट्रातील प्रत्येक विभागातील प्रथम क्रमांकाच्या शाळा या राज्यस्तरावर एकमेकांशी स्पर्धा करतील. या स्पर्धेतून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी निवडलेल्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना अनुक्रमे रु.५१.०० लक्ष. ३१.०० लक्ष व २१.०० लक्ष इतक्या रकमेचे पारितोषिक अनुज्ञेय असेल. अशाच प्रकारचे पारितोषिक इतर व्यवस्थापनांच्या शाळांना अनुज्ञेय असेल.
४.६ जिंकलेल्या पारितोषिकाच्या रकमेचा विनियोग :-
कोणत्याही स्तरावर जिंकलेल्या पारितोषिकाच्या रकमेचा विनियोग करण्याचा अधिकार शाळांच्या गरजांचा प्राधान्यक्रम विचारात घेऊन संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीस असेल.
पारितोषिकाच्या रकमेसह अभियानासाठी एकूण खर्च अंदाजे रु.८६.७२ कोटी इतक्या खर्चास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.
सदर अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आयुक्त (शिक्षण). महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कार्यकारी समिती गठीत करण्यात आली आहे. अभियानाचा प्रचार व प्रसार तसेच अंमलबजावणी यासाठी आवश्यक ती उपाययोजना करणे सदर समितीची जबाबदारी असेल. यासाठी रु.१२.९० कोटी इतका निधी आयुक्त (शिक्षण) यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर निधी विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून खर्च करण्यास ते सक्षम असतील.
माझी शाळा सुंदर शाळा अभियान नोंदणी
७. या प्रीत्यर्थ होणारा खर्च मागणी क्रमांकई-०२ २२०२. सर्वसाधारण शिक्षण. ०१. प्राथमिक शिक्षण. १०१. शासकीय प्राथमिक शिक्षण (००) (०१) राज्यात आदर्श शाळा विकसित करणे (कार्यक्रम) (२२०२ जे ०७२) ५०-इतर खर्च या लेखाशीर्षाखालील सन २०२४-२५ या चालू वित्तीय वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. यासाठी आयुक्त (शिक्षण). महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रक अधिकारी व लेखाधिकारी, प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
८. सदर शासन निर्णय वित्तीय अधिकार नियमपुस्तिका १९७८. भाग पहिला. उपविभाग भाग-३. अनुक्रमांक ४ मधील परिच्छेद क्रमांक २७ (२) (ब) अन्वये प्रशासनिक विभागांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार तथा शासनाच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे
माझी शाळा सुंदर शाळा निकष pdf
९. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०७२६१६४५१२१९२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
अधिक माहिती साठी संपूर्ण शासन निर्णय download करण्यासाठी येथे click करा.
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा माहिती भरण्यासाठी, आवश्यक असणारे जुनी फोटो यादी साठी येथे click करा.
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टाईप करावयाची जुनी माहिती Word / Text फाईल साठी येथे click करा.
- माझी शाळा सुंदर शाळा अभियान Details in Highlights
- नाव- मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा
- सुरुवात- महाराष्ट्र शासन
- विभाग- शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य
- राज्य महाराष्ट्र
- उद्देश- पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांना त्यांच्या शाळेतील जबाबदाऱ्यांबद्दल शिक्षित करण्याचा
- Mode- Online
- कालावधी- दिनांक 01 जानेवारी, 2024 ते दिनांक 15 फेब्रुवारी, 2024
- Official Website- https://education.maharashtra.gov.in/
- मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान | मराठी माहिती 2024
माझी शाळा सुंदर शाळा
माझी शाळा सुंदर शाळा अभियान
माझी शाळा सुंदर शाळा निकष pdf
माझी शाळा सुंदर शाळा अभियान मूल्यमापन निकष
माझी शाळा सुंदर शाळा मुल्यांकन निकष
माझी शाळा सुंदर शाळा अभियान मूल्यांकन निकष
माझी शाळा सुंदर शाळा नोंदणी
माझी शाळा सुंदर शाळा अभियान नोंदणी
Mazi Shala sundar Shala registration
Mukhyamantri mazi Shala sundar Shala registration
Majhi Shala sundar Shala registration
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा - 2 अभियानाचा कालावधी:
- दि. २९ जुलै ते दि.०४ ऑगस्ट, २०२४ पूर्व तयारीसाठी असेल.
- दि.५ ऑगस्ट २०२४ रोजी औपचारिक कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरुवात होईल व हे अभियान एक महिना कालावधीसाठी असेल दि.०४ सप्टेंबर २०२४ रोजी अभियानाचा कालावधी पूर्ण होईल.
- दि.०५ सप्टेंबर २०२४ ते दि. १५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडण्यात यावी.
- त्यानंतरच्या सुयोग्य दिनांकास या अभियानाचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होईल.
माझी शाळा सुंदर शाळा टाईप करायची माहिती नमुना टप्पा दोन प्रमाणे नाही कृपया असेल तर पाठवा
उत्तर द्याहटवा