दहावीच्या वर्गात तुमचे स्वागत आहे. भूगोल विषयाच्या महत्वाच्या नोट्स मधील भूगोल विषय तुम्ही इयत्ता तिसरी ते पाचवी परिसर अभ्यासातून, तसेच इयत्ता सहावी ते नववी भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातून शिकला आहात. इयत्ता दहावीसाठी भूगोलाचे नवीन महत्वाच्या नोट्स तुमच्या हाती देताना आनंद वाटतो आहे.
इ 10 वी भूगोल महत्वाच्या नोट्स | Geography IMP Notes
तुमच्या अवतीभोवती अनेक घटना घडत असतात. तुम्हांला सामावून घेणारा निसर्ग ऊन, पाऊस, थंडीच्या रूपाने तुम्हांला सारखा भेटत असतो. अंगाशी खेळणारी वाऱ्याची झुळूक तुम्हांला आल्हाददायक वाटत असते. अशा अनेक नैसर्गिक घटना, निसर्ग इत्यादींचे स्पष्टीकरण भूगोल विषयाच्या अभ्यासातून मिळते. भूगोल तुम्हांला सतत निसर्गाकडे नेण्याचा प्रयत्न करतो. भूगोल विषयात सजीवांचा निसर्गाशी तसेच एकमेकांशी होणाऱ्या आंतरक्रियांचा अभ्यास केला जातो.
या विषयातून तुम्ही पृथ्वीच्या संदर्भात अनेक मूलभूत संकल्पना यापूर्वी शिकल्या आहेत. तुमच्या रोजच्या जीवनाशी निगडित असणारे अनेक घटक तुम्हांला या विषयातून समजून घेता आले आहेत. त्याचा तुम्हांला भविष्यात नक्की उपयोग होईल. या विषयातून आपण आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आंतरक्रियांचाही अभ्यास केला आहे.
हा विषय शिकण्यासाठी निरीक्षण, आकलन, विश्लेषण, चिकित्सक विचार ही कौशल्ये महत्त्वाची आहेत. ती नेहमी वापरा, जोपासा. नकाशे, आलेख, चित्राकृती, माहिती संप्रेषण, तक्ते इत्यादी या विषयाच्या अभ्यासाची साधने आहेत. ती हाताळण्याचा सराव करा. या पाठ्यपुस्तकातून तुम्हाला ही संधी दिली आहे.
इयत्ता दहावी भूगोल स्वाध्याय
10 वी भूगोल बोर्डाला आलेले प्रश्न | Board Exam IMP Questions
खालील दिल्याप्रमाणे तुम्ही या pdf डाउनलोड करू शकता आणि दहावी बोर्ड परीक्षा ची तयारी उत्तम प्रकारे करू शकता. त्याचप्रमाणे आपण जसे याठिकाणी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक आणि भाग दोन च्या PDF उपलब्ध केलेल्या आहेत तशाच इतर विषयांच्या इयत्ता दहावी महत्वाच्या नोट्स | IMP Notes Pdf देखील उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
दिलेल्या PDF चा तुम्हाला काय फायदा होणार आहे?
जर तुम्ही वरील PDF चा अभ्यास करताय तर तुम्हाला बोर्ड परीक्षेत नेमके कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात या संदर्भात माहिती मिळेल. तुम्हांला तुमच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हार्दिक शुभेच्छा.
Class 10 Social Science History Geography PDF Free To Download. SCERT Educational Study Material. इयत्ता दहावी समाजशास्र महत्वाच्या नोट्स IMP Notes Pdf
COMMENTS