School Health & Wellness Programme
Refer Links |
|
School Registration| शाळा नोंदणी |
|
Training Material | प्रशिक्षण
साहित्य |
School Health Programme - Day First
https://youtu.be/UasNktFJtkA
भारत सरकारने ‘आयुषमान भारत’ योजनेंतर्गत संपूर्ण देशात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि केंद्रीय शालेय शिक्षण मंत्रालय यांचे मार्फत ‘शालेय आरोग्य कार्यक्रम’ (School Health & Wellness Programme) सुरु केला आहे. शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शासकीय अनुदानित इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळांमध्ये सदर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक सवयी, जाणीवा या विषयी जनजागृती व जबाबदारी निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
आपल्या राज्यामध्ये आयुषमान भारत उपक्रमांतर्गत SCHOOL HEALTH AND WELLNESS कार्यक्रम यवतमाळ, पालघर, अहमदनगर, ठाणे, नाशिक, जालना व हिंगोली या जिल्ह्यातील इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व शासकीय अनुदानित शाळांमध्ये राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग आणि शालेय शिक्षण विभाग यांच्या समन्वयाने राबविण्यात येणार आहे.
उपरोक्त जिल्ह्यातील इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व शासकीय अनुदानित प्रकारच्या प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक, एक पुरुष शिक्षक व एक महिला शिक्षक असे एकूण तीन व्यक्तींना आरोग्यवर्धिनी दूत SCHOOL HEALTH AND WELLNESS AMBASSADOR म्हणून online प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
सदर प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेल्या प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक व दोन शिक्षक यांनी प्रस्तुत पोर्टल वरील मेनू pre-test, training session, schedule यावर शाळा UDISE क्रमांकाद्वारे लॉगीन करून वेळापत्रकाप्रमाणे उपस्थित रहायचे आहे. प्रशिक्षणार्थींनी सोबतच्या मार्गदर्शक सूचनांचे अवलोकन करून पालन करावे.
COMMENTS